शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

एस-टी बसच्या संपाने सोलापूर आगाराला बसला चार कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 3:50 PM

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कामगारांनी सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या चार दिवसांच्या संपामुळे महामंडळाला तब्बल चार कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले. ऐन दिवाळीत हा संप पुकारला गेला. पाचव्या दिवशी संप मिटल्यानंतर प्रवासी आणि एस. टी. प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आणि यंत्रणा कामाला लागली. ...

ठळक मुद्देएस.टी. संप; रिक्षांसह हॉटेल, टपºयांवर परिणामएस. टी. महामंडळाला दिवाळीत मिळणारे उत्पन्नही घटलेपरतीच्या प्रवासासाठी १२० अशा २५० गाड्या

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कामगारांनी सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या चार दिवसांच्या संपामुळे महामंडळाला तब्बल चार कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले. ऐन दिवाळीत हा संप पुकारला गेला. पाचव्या दिवशी संप मिटल्यानंतर प्रवासी आणि एस. टी. प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आणि यंत्रणा कामाला लागली. भाऊबीजेनिमित्त आणि दुसºया दिवशी २५० जादा गाड्या सोडून प्रवाशांना तत्पर सेवा देण्यात आली. एस. टी. कामगार संघटनांकडून गेल्या काही महिन्यांपासून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी शासनाकडे विविध मार्गाने चर्चा, निवेदने देऊन वाटाघाटी करुनही सरकार दखल घेत नसल्याने संपाची नोटीस बजावून १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत उपोषण छेडले. राज्यभर धावणाºया एस. टी. महामंडळाच्या बस आगारांमध्ये थांबून राहिल्या. ऐन दिवाळीत पुकारलेल्या या संपामुळे ज्या हक्काच्या एस. टी. वर लाखो प्रवाशांची भिस्त होती तीच बंद झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सरकारने हा संप मोडित काढावा प्रवाशांची सोय करण्यासाठी खास परिपत्रक काढून खासगी वाहनांद्वारे सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात खासगीवाल्यांनी संधीसमजून अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट केली. गेली पन्नास वर्षांत ऐन दिवाळीत सलग चार दिवस बेमुदत संप होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या संपाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. शिवाय एस. टी. महामंडळाला दिवाळीत मिळणारे उत्पन्नही घटले गेले. सोलापूर विभागातील नऊ आगारांमध्ये दररोज सरासरी ८० लाखांचे उत्पन्न मिळते. दिवाळीसारख्या मोठ्या सणात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ती या कालावधीत एक कोटीच्या घरात जाते. यंदा चार दिवस संपामुळे बस बंद असल्याने सोलापूर विभागाचे सरासरी चार कोटी रुपये उत्पन्न बुडाले. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाने शासन आणि कामगारांना लोकहिताचा विचार करुन खडे बोल सुनावत मध्यस्थीचा तोडगा सुचवत त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. लागलीच यंत्रणा खडबडून जागी झाली आणि शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर युद्धपातळीवर सूचना केल्या गेल्याने शनिवारी सकाळपासून चार दिवस जागेवर थांबलेली एस. टी. सुरु झाली. भाऊबीजेचा दिवस असल्याने आणि एस. टी. बस सुरु झाल्याने परगावी जाणाºया प्रवाशांची सोय झाली. यानिमित्त सोलापूर विभागातून नियमित गाड्यांशिवाय शनिवारी १३० जादा गाड्या सोडल्या. परतीच्या प्रवासासाठी रविवारी १२० अशा २५० गाड्या सोडून प्रवाशांना तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न केल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजीत जानराव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

------------------------एस.टी. संप; रिक्षांसह हॉटेल, टपºयांवर परिणामच्चार दिवस एस. टी. महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम प्रवाशांसह रिक्षा, हॉटेल, टपºयांवरही झाल्याचे दिसून आले. दिवाळीच्या खरेदीसह परगावी जाणाºया प्रवाशांच्या गर्दीमुळे रिक्षा वाहतूक, हॉटेल, टपºयांसह छोट्या व्यावसायिकांचे चलन चालायचे. मात्र एस. टी. च बंद असल्याने प्रवाशांची संख्या रोडावली. याचा थेट परिणाम छोट्या व्यावसायिकांवरही झाला. दिवाळीत अन्य कालावधीपेक्षा चार पैसे जादा कमावण्याची संधी असते यंदा मात्र संपामुळे निर्बंध आल्याचे या व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ------------------------‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ सदैव कार्यरत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने यंदा दिवाळीत कामगारांच्या संपामुळे प्रवाशांना सेवा देता आली नाही. मात्र चार दिवसांच्या संपानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मार्ग निघताच शनिवारपासून तत्पर सेवा देण्यात आली. वेळापत्रकानुसार भाऊबीज आणि दुसºया दिवशी विशेष गाड्या सोडण्यात आल्या.- अश्वजीत जानराव,विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर विभाग