शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; साेलापुरात ७६ लाख ४३ हजाराचा किटकबाधित सुपारीचा साठा जप्त

By appasaheb.patil | Updated: June 28, 2024 18:18 IST

Solapur News: सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील मार्केट यार्ड चौकात ७६ लाख ४३ हजार ३७६ रूपये किंमतीचा रंगमिश्रित व किटकबाधित सुपारीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने सोलापुरात पकडला. याप्रकरणी पुढील कारवाई वेगाने करण्यात येत आहे.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील मार्केट यार्ड चौकात ७६ लाख ४३ हजार ३७६ रूपये किंमतीचा रंगमिश्रित व किटकबाधित सुपारीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने सोलापुरात पकडला. याप्रकरणी पुढील कारवाई वेगाने करण्यात येत आहे.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की, २७ जून २०२४ रोजी विशेष पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापुरातील मार्केट यार्ड चौकात केए १४ सी ७५१५, केए १४ सी ०८५० व केए १४ सी ४६१९ या वाहनांची अचानक तपासणी केली असता त्यात रंगमिश्रित व किटकबाधित सुपारीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी किटकबाधित व रंगमिश्रित अन्नपदार्थाचे नमुने ताब्यात घेतले. कमी दर्जाच्या संशयावरून ७३ हजार ४९३ किलो माल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत पुढील कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाचे सहाय्यक आयुक्त सा.ए. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे, उमेश भुसे, रेणुका पाटील तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने पूर्ण केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूरFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग