Solapur: सोलापूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या २६६ मुलींना मिळाले 'प्लेसमेंट'चे ट्रेनिंग!

By संताजी शिंदे | Published: March 4, 2024 06:37 PM2024-03-04T18:37:37+5:302024-03-04T18:38:01+5:30

Solapur News: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध संकुलामध्ये शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील २६६ विद्यार्थिनींना प्लेसमेंटचे ट्रेनिंग देण्यात आले. पुणे आणि मुंबई येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी पाच दिवस या विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून तयारी करून घेतली.

Solapur: 266 final year girls of Solapur University received 'placement' training! | Solapur: सोलापूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या २६६ मुलींना मिळाले 'प्लेसमेंट'चे ट्रेनिंग!

Solapur: सोलापूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या २६६ मुलींना मिळाले 'प्लेसमेंट'चे ट्रेनिंग!

- संताजी शिंदे 
सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध संकुलामध्ये शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील २६६ विद्यार्थिनींना प्लेसमेंटचे ट्रेनिंग देण्यात आले. पुणे आणि मुंबई येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी पाच दिवस या विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून तयारी करून घेतली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी मिळावी, यासाठी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी प्लेसमेंट व ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली आहे. रसायनशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. अनिल घनवट यांच्याकडे या सेंटरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून पहिल्यांदाच विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील २६६ विद्यार्थिनींना विविध उद्योग समूह व कंपन्यांमध्ये नोकरीला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी व कशा रीतीने सामोरे जावे, याविषयी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

संभाषण कौशल्य, इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर, व्यक्तिमत्व विकास, गटचर्चा, व्यवसायिक नीतीशास्त्र, रोजगार कौशल्य, वेळेचे व पैशाचे व्यवस्थापन, मुलाखत तंत्र, सादरीकरण तंत्र, नवीन तंत्रज्ञानाचा वापर याविषयी तज्ञांनी प्रशिक्षण दिले. महिंद्रा प्राइड क्लासरूम अंतर्गत नांदी फाउंडेशनच्या सहकार्याने प्रशिक्षण शिबिर पार पडले. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेंटरचे डॉ. अनिल घनवट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये मंजिरी हिरमुखे, शिल्पा खुने,  स्वस्ती खंडागळे, कीर्ती गाडे या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. तसेच नांदी फाउंडेशनचे पंकज दांडगे व सीमा भागवत यांचे यासाठी सहकार्य लाभले. कुलसचिव योगिनी घारे व संगणकशास्त्र संकुलातील डॉ. राजीवकुमार मेंते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Web Title: Solapur: 266 final year girls of Solapur University received 'placement' training!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.