आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव येथील एका महिलेस मारहाण करुन तिच्यावर तिघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेची पोलीसांनी दिलेल माहिती अशी की, पिडीत महिला मुळ वडगाव (ता़ द़ सोलापूर) येथील रहिवाशी असून ती सद्या सोलापूरातील साईनगर अक्कलकोट भागात राहत आहे. रविवार २५ फेबु्रवारी २०१८ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अनोळखी तिघांनी फिर्यादी आणि रविकिरण बनसोडे या दोघांचा रस्ता अडवुन मारहाण केली. त्यानंतर तिघांनी पिडीत महिलेस समाधान नगर परिसरात नेहुन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला़ या घटनेनंतर तिच्याजवळ असलेला मोबाईल, मंगळसुत्र आणि ४ हजार ५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने घेऊन गेल्याची नोंद फिर्यादीत आहे़ या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी भेट दिली.-----------------वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील घटना बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाले आहेत. ही घटना वळसंग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठांच्या परवागीनुसार हा गुन्हा वळसंग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.- कमलाकार पाटीलवरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर
वडगावच्या विवाहित महिलेवर सोलापूरात सामुहिक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:34 IST
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव येथील एका महिलेस मारहाण करुन तिच्यावर तिघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वडगावच्या विवाहित महिलेवर सोलापूरात सामुहिक बलात्कार
ठळक मुद्देया घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी भेट दिली.याप्रकरणी तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाले आहेत. ही घटना वळसंग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठांच्या परवागीनुसार हा गुन्हा वळसंग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार : कमलाकार पाटील