शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

आतापर्यंत दोन लाख ४२ हजार शेतकºयांना पीकविम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 13:49 IST

सोलापूर जिल्हा; हप्ता भरलेल्या शेतकºयांच्या विम्यासाठी शिफारस करणार, जिल्हाधिकाºयांची माहिती

ठळक मुद्देखरीप हंगाम २0१८ मध्ये सोलापूर जिल्ह्यात दोन लाख ४२ हजार ८८१ शेतकºयांना २२५ कोटी २0 लाख रुपये वितरीत करण्यात आलेयंदाच्या वर्षाची पीक विमा योजनेची अंतिम मुदत २४ जुलै २0१९ पर्यंत असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकºयांनी सहभाग घ्यावाजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजना जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक

सोलापूर : विमा हप्ता भरलेला असूनही तांत्रिक कारणामुळे विमा हप्ता कंपनीकडे जमा झाला नाही, या कारणावरून ज्या शेतकºयांना विम्याचा लाभ नाकारण्यात आला; अशा शेतकºयांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, अशी शिफारस राज्य समितीकडे करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजना जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, शेतकरी प्रतिनिधी गोरख घाडगे, नान्नजकर उपस्थित होते.  

विमा हप्ता भरतांना महा-ई-सेवा केंद्रावर अंतिम मुदतीवेळी जास्त गर्दी होते. यामुळे अनेकवेळा वेबसाईट बंद पडणे, कनेक्टिव्हीटीअभावी महा-ई-सेवा केंद्र व्यवस्थित न चालणे  अशा  तांत्रिक अडचणी उद्भवतात यामुळे शेतकºयांचा विमा हप्ता   महा-ई-सेवा केंद्राकडून कपात   केला जातो; मात्र विमा कंपनीकडे जमा होत नाही. यामध्ये शेतकºयांचा काहीही दोष नाही. अशा शेतकºयांना विमा योजनेचा  लाभ मिळावा, याबाबत राज्यस्तरीय समितीस शिफारस करावी,  अशी मागणी उपस्थित प्रतिनिधींनी केली. त्यावर जिल्हाधिकारी  डॉ. भोसले यांनी राज्य समितीकडे अशी शिफारस केली जाईल असे सांगितले. 

खरीप हंगाम २0१८ मध्ये सोलापूर जिल्ह्यात दोन लाख ४२ हजार ८८१ शेतकºयांना २२५ कोटी २0 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षाची पीक विमा योजनेची अंतिम मुदत २४ जुलै २0१९ पर्यंत असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकºयांनी सहभाग घ्यावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी केले.

अन्यथा बँक अधिकाºयांवर फौजदारी- सांगोला येथील ४३५ शेतकºयांनी भारतीय स्टेट बँकेकडे विमा हप्ता भरला होता.  पण बँकेने तो वेळेत विमा कंपनीकडे सादर केला नाही. त्यामुळे हे शेतकरी विमा लाभापासून वंचित राहिले होते; मात्र आता शेतकºयांचे प्रस्ताव स्वीकारले असून लवकरच विमा रक्कम  देण्याचे आश्वासित केले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाºयांनी  दिली. मात्र शेतकºयांना विमा रक्कम न मिळाल्यास संबंधित बँक अधिकारी अथवा विमा कंपनी अधिकारी यापैकी जे दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी दिला. 

बँकेने द्यावी विम्याची रक्कम- सांगोला तालुक्यातील जगन्नाथ साळुंखे यांनी एचडीएफसी बँकेकडून डाळिंब पिकासाठी कर्ज घेतले होते. कर्ज घेतल्यावर पिकाचा विमा हप्ता एचडीएफसी बँकेने भरणे अपेक्षित असताना रक्कम कपात न केल्याने संबंधित शेतकरी विमा रकमेपासून वंचित राहिले. याला एचडीएफसी बँक पूर्ण जबाबदार असून बँकेने साळुंखे यांना पीक विमा मंजूर रक्कम व्याजासहित द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय