मग तुम्ही नाहीत का शिवसैनिक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST2021-07-22T04:15:19+5:302021-07-22T04:15:19+5:30

स्थळ : सोलापूर शहराचा हद्दवाढ परिसर. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होते. सेनेच्या नेत्यांची शिवसैनिकांना बळ देणारी भाषणे सुरू होती. ...

So aren't you a Shiv Sainik? | मग तुम्ही नाहीत का शिवसैनिक?

मग तुम्ही नाहीत का शिवसैनिक?

स्थळ : सोलापूर शहराचा हद्दवाढ परिसर. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होते. सेनेच्या नेत्यांची शिवसैनिकांना बळ देणारी भाषणे सुरू होती. आलेली मरगळ झटकून टाका. भगवा खांद्यावर घ्या आणि सोलापूर महानगरपालिकेवर हा भगवा फडकवा, असे आवाहन नेते करीत होते. सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांचे भाषण रंगात आलेले... जोशपूर्ण... ते म्हणाले, हद्दवाढ भाग सेनेचा बालेकिल्ला आहे. आगामी काळात शिवसैनिकांचा कस लागणार आहे. माझ्यापेक्षा याला उमेदवारी द्या, तोच खऱ्या अर्थाने सक्षम उमेदवार ठरेल. त्याचे काम माझ्यापेक्षा सरस असल्यामुळे तोच या प्रभागात निवडून येऊ शकतो, असे म्हणणारा खरा शिवसैनिक आहे. अशाच शिवसैनिकांची शिवसेनेला गरज आहे. (टाळ्या) त्यावर एक शिवसैनिक हळूच पुटपुटतो, हेच सांगा आम्हाला कायम. मग तुम्ही नाही का निष्ठावंत? यंदा कळेलच की !

- नारायण चव्हाण

Web Title: So aren't you a Shiv Sainik?