फेसबुकवर बदनामी करणाऱ्या वेटरच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST2021-06-16T04:30:36+5:302021-06-16T04:30:36+5:30
श्रीपुर: अकलूज परिसरात संग्रामनगर येथे हॉटेलमधून कामावरून काढले म्हणून कामगार महिलांची फेसबुकवरती बदनामी करणाऱ्या वेटरच्या मुसक्या आवळून ...

फेसबुकवर बदनामी करणाऱ्या वेटरच्या मुसक्या आवळल्या
श्रीपुर: अकलूज परिसरात संग्रामनगर येथे हॉटेलमधून कामावरून काढले म्हणून कामगार महिलांची फेसबुकवरती बदनामी करणाऱ्या वेटरच्या मुसक्या आवळून अकलूज पोलिसांनी त्याला सातारा जिल्ह्यातील अंगापूर येथून ताब्यात घेतले. सोमाजी ऊर्फ सोमनाथ सूर्यकांत शिंदे (रा. अंगापूर, जि. सातारा) असे साताऱ्यात ताब्यात घेतलेल्या वेटरचे नाव आहे.
तो संग्रामनगर-अकलूज येथे नंदकिशोर भंडारे यांच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. मार्च २०२० मध्ये कोरोनाकाळात हॉटेल बंद करण्यात आले. त्यानंतर आरोपी सोमाजी हा त्याच्या गावी गेला. तेथून हॉटेल मालकाच्या घरातील व कामगार महिलांचे फेसबुक अकाऊंट शोधून त्यावर अश्लील मेसेज व फोटो अपलोड करू लागला. कामावरून काढल्याचा राग मनात धरून त्याने हॉटेलमालकाच्या घरातील मुलांना पळवून नेण्याची धमकी देत होता. सुहास क्षीरसागर, रामचंद्र चौधरी, विकी घाडगे, मंगेश पवार यांच्या पोलीस पथकाने त्याला अंगापूर-सातारा येथून अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर करत आहेत.