पावसाने शिवारात दरवळला मातीचा सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:51+5:302021-06-02T04:17:51+5:30
मृग नक्षत्रातील पाऊस बाकी आहे खरिपासाठी दमदार पावसाची गरज कायम आहे. उन्हामुळे जमिनी तापलेल्या आहेत. अनेक ठिकाणी भेगा पडल्या ...

पावसाने शिवारात दरवळला मातीचा सुगंध
मृग नक्षत्रातील पाऊस बाकी आहे खरिपासाठी दमदार पावसाची गरज कायम आहे. उन्हामुळे जमिनी तापलेल्या आहेत. अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या जमिनींना जोरदार पावसाची गरज आहे. मात्र, पावसाला सुरुवात झाल्याने शिवारात मातीचा गंध पसरला व ग्रामीण भागात चैतन्याचे वातावरण झाले आहे.
----
का मातीचा सुगंध येतो
पहिला पाऊस पडला की, मातीचा गंध आपल्याला धुंद करून जातो, सुखावून जातो. कुठल्याही अत्तराच्या कुपीत नसलेला हा सुगंध जमिनीतील स्ट्रॅप्टोमायसीस (स्पोअर्स ) हा जीवाणू उष्ण हवामानात न वाढता कठीण कवचधारी पेशीच्या स्वरूपात जमिनीत राहतात. पहिल्या पाऊसामुळे स्पोअर्स हवेत विखुरतात. त्यात जिओस्मीन नावाचे जैवरसायन असते, त्याचा वास आपणास येतो. तोच मातीचा सुगंधी गंध म्हणून ओळखला जातो. बॅक्टेरिया स्पोअर्समुळे निर्माण झालेला वास हा मनाला प्रसन्नता देणारा असतो.
---