शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Smart solapur ; सोलापुरातील ५० यंत्रमाग कारखाने झाले अपग्रेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:11 IST

महेश कुलकर्णी सोलापूर : चादर आणि टॉवेलसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरचा पॉवरलूम उद्योग आता हळूहळू कात टाकतोय. भारतासह संपूर्ण जगाला ...

ठळक मुद्देस्मार्ट रॅपिअर लूम बसविण्यासाठी सरसावले उद्योजक जागतिक बाजारपेठेत सोलापूरच्या टेक्स्टाईल उत्पादनांचे वेगळे स्थानसोलापुरात चादरी तयार करणारे कारखाने साधारणत: ९० ते १०० च्या आसपास

महेश कुलकर्णीसोलापूर : चादर आणि टॉवेलसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरचा पॉवरलूम उद्योग आता हळूहळू कात टाकतोय. भारतासह संपूर्ण जगाला बाथ टॉवेल पुरविणाºया यंत्रमाग उद्योगात मोठ्या प्रमाणात अपग्रेडेशन सुरू आहे. दिवसाला ३० किलो सूत कातणारे जुने लूम्स जाऊन आता परदेशी बनावटीचे नवे रॅपिअर लूम कारखान्यांमध्ये धडधडताहेत. सध्या ५० उद्योजकांनी असे लूम्स मागविले आहेत. येत्या सहा महिन्यांत आणखी ५० कारखाने अपग्रेड होणार आहेत.

सोलापूरला स्मार्ट करण्यासाठी सरकारने राज्यातील दहा शहरांच्या यादीत सोलापूरचा समावेश केला आहे. एकूणच शहर स्मार्ट होण्यासाठी शेकडो कोटी रुपयांची कामे सध्या शहरात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरचा नावाजलेला यंत्रमाग उद्योगही मागे राहिला नाही. तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी कारखानदार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. परंपरागत यंत्रमागाच्या जागी आता नवे आधुनिक यंत्रमाग बसविण्याचे काम झपाट्याने सुरू आहे. शहरात एकूण साडेसहाशेच्या आसपास कारखाने आहेत. यातील ५० कारखान्यांंनी आधुनिक रॅपिअर लूम्स बसविले आहेत. हे लूम चीन, जर्मनी, इटली, बेल्जियम या देशांत तयार होतात. सोलापुरात प्रामुख्याने चीन, जर्मनी आणि बेल्जियमचे लूम्स आणले जात आहेत. येत्या सहा महिन्यांत आणखी ५० कारखानदारांची आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन वर्षांत ३०० पेक्षा अधिक कारखान्यांमध्ये आधुनिक लूम्स बसविण्यात येणार आहेत.

‘एअरजेट’चा प्रवेश- जपानी बनावटीचे टोयाटो एअरजेट लूम म्हणजे वेगाने उत्पादन असे समीकरण महाराष्टÑातील यंत्रमाग उद्योजकांत आहे. अत्यंत आधुनिक मानले जाणारे हे लूम सोलापुरात विनायक राचर्ला आणि इंदरमल जैन या दोन उद्योजकांनी आणले आहेत़ जुन्या लूमच्या तुलनेत दहापट अधिक वेगाने हे लूम उत्पादन करते. दररोज ३०० किलो सूतकताई आणि दिवसाला ६०० टॉवेल्स या लूममध्ये बनतात.

१२०० ग्रॅमची चादर, ५०० ग्रॅमचा टॉवेल- सोलापुरातील चादर आणि टॉवेल उद्योगाची वार्षिक उलाढाल ११०० कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये टर्किश टॉवेलचा ८० टक्के वाटा आहे. उर्वरित २० टक्के जेकार्ड चादरी बनविल्या जातात. सोलापूरच्या एका चादरीला साधारणत: १२०० ग्रॅम सूत लागते तर टॉवेलला ४०० ते ५०० ग्रॅम एवढे सूत लागते.

रॅपिअरमध्ये दररोज १५० किलो सूतकताई- जुन्या लूमवर एका दिवसात साधारणत: ३० किलो सूतकताई होते. नवीन रॅपिअर लूममध्ये दिवसाला १५० किलो सूतकताई होते. यामुळे उत्पादनात पाचपट वाढ झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षांत बॅकफूटवर आलेला हा उद्योग आता नव्याने भरारी घेत आहे.

चादरीतही रॅपिअर - सोलापुरात चादरी तयार करणारे कारखाने साधारणत: ९० ते १०० च्या आसपास आहेत. पारंपरिक पद्धतीने चादरी करणाºया कारखानदारांच्या नवीन पिढीने आधुनिक शिक्षण घेतल्यामुळे अपग्रेडेशनचे काम आता सुरू झाले आहे. ९० पैकी १० कारखानदारांनी चादरी बनविण्यासाठी नवे रॅपिअर लूम मागविले आहेत. 

जागतिक बाजारपेठेत सोलापूरच्या टेक्स्टाईल उत्पादनांचे वेगळे स्थान आहे. आखाती देश, जर्मनी, उत्तर अमेरिका, श्रीलंका, नेपाळ या ठिकाणी इथल्या मालाला चांगली मागणी आहे. आधुनिकीकरणामुळे उत्पादन क्षमता अनेक पटीने वाढणार आहे. यामुळे अनेक कारखानदार यासाठी प्रयत्नशील आहेत. टफ अर्थात टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीमची सबसिडी शासनाने वाढवून ३० ते ३५ टक्के केल्यास अपग्रेडेशनची प्रक्रिया गतिमान होणार आहे.- पेंटप्पा गड्डमअध्यक्ष, यंत्रमागधारक संघ.

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीTextile Industryवस्त्रोद्योग