शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

स्मार्ट सिटीने साडेचार कोटी रुपये खर्चून उभारलेले सोलापुरातील अ‍ॅडव्हेंचर पार्क धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 15:11 IST

सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी भाजप-सेनेतील वाद; महापालिकेकडे हस्तांतरित न झाल्याचा परिणाम

ठळक मुद्देअ‍ॅडव्हेंचर पार्क मनपाकडे हस्तांतरित झाल्यानंतर मनपा ते खासगी मक्तेदाराला चालविण्यास देणार शहरात एक चांगले अ‍ॅडव्हेंचर पार्क तयार होऊनही वापरात आलेले नाही९ सप्टेंबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत तातडीचा प्रस्ताव

राकेश कदम

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून साडेचार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अ‍ॅडव्हेंचर पार्क भाजप आणि शिवसेनेतील वादामुळे धूळखात आहे. पुढील चार महिन्यात यावर निर्णय होण्याची शक्यता नसल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

रिपन हॉलच्या मागे मनपाची उद्यान विभागाची जागा आहे. या जागेत पूर्वी नर्सरी फुलविण्यात येत होती. स्मार्ट सिटी योजनेतून या ठिकाणी अ‍ॅडव्हेंचर पार्क उभारण्याचा निर्णय झाला. सोलापुरात एक खासगी अ‍ॅडव्हेंचर पार्क आहे. पण ते शहराच्या बाहेर आहे. मनपाची जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या ठिकाणी अ‍ॅडव्हेंचर पार्क केल्यामुळे सर्वच भागातील नागरिकांची सोय होईल, असा स्मार्ट सिटी कंपनीचा उद्देश आहे. 

चार कोटी ३४ लाख रुपये खर्चून येथे रोप वे, रॉक क्लायबिंग, जंपिंग, स्लायडिंग लायब्ररी, रेस्टॉरंट, अ‍ॅम्फी थिएटर, वॉकिंग ट्रॅक अशा अनेक आकर्षक गोष्टी साकारण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेतील हे वैशिष्ट्यपूर्ण काम असल्याचे सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाºयांचे मत आहे. मे २०१९ मध्ये या पार्कचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर ते मनपाच्या उद्यान विभागाकडे हस्तांतरित होणे अपेक्षित आहे. हस्तांतरण अद्याप झालेले नाही. 

अ‍ॅडव्हेंचर पार्क माझ्या काळात सर्वांसाठी खुले व्हावे असा प्रयत्न आहे. या विषयाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आल्यानंतर काही लोकांनी विरोध केला. या पार्कसाठी मी आग्रही होते. त्यामुळे काही लोक अडथळे आणत होते. पार्कच्या कामात शंका असल्यास त्या दूर करण्यात येतील. १९ सप्टेंबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत तातडीचा प्रस्ताव आणून हा अ‍ॅडव्हेंचर पार्कचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील. - शोभा बनशेट्टी, महापौर

सोलापूर महापालिका मक्तेदार नेमणार अ‍ॅडव्हेंचर पार्क मनपाकडे हस्तांतरित झाल्यानंतर मनपा ते खासगी मक्तेदाराला चालविण्यास देणार आहे. या मक्तेदाराने तांत्रिक माणसे नेमून साहसी खेळ खेळण्यास येणाºयांची काळजी घेणे अपेक्षित आहे. या मक्तेदाराला रेस्टॉरंट, अ‍ॅॅम्फी थिएटरही चालविण्यास दिले जाणार आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया लवकर होणे अपेक्षित आहे.  

नुकसान काय ? शहरात एक चांगले अ‍ॅडव्हेंचर पार्क तयार होऊनही वापरात आलेले नाही. पार्कमधील साहित्य वापरात न आल्यास खराब होण्याचा धोका आहे. ऊन, वारा आणि पावसामुळे साडेचार कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत. 

भाजप पदाधिकाºयांमध्ये ताळमेळ नाही- स्मार्ट सिटी योजनेतून विकसित झालेली हुतात्मा बाग, अ‍ॅडव्हेंचर पार्क, रंगभवन प्लाझा, होम मैदान यासह इतर कामे मनपाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला होता. स्मार्ट सिटीतील कामे निकृष्ट असल्याचे कारण देऊन भाजप, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी या हस्तांतरणास विरोध केला. वास्तविक अ‍ॅडव्हेंचर पार्क, हुतात्मा बाग हस्तांतरित करून उर्वरित कामे तपासणीनंतर मनपाकडे हस्तांतरित करण्यात यावीत, असा प्रस्ताव मंजूर करणे अपेक्षित होते, परंतु भाजप पदाधिकाºयांमध्ये ताळमेळ नव्हता. शिवसेनेच्या प्रश्नांना त्यांना उत्तर देता आले नाही. दोन महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव परत पाठविण्यात आला. दोन महिन्यानंतर भाजप नगरसेवकांनी यासंदर्भात पाठपुरावा केलेला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना