स्मार्ट अंगणवाडी ही काळाची गरज : सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST2021-09-19T04:23:27+5:302021-09-19T04:23:27+5:30

मोहोळ तालुक्यातील औंढी येथे महिला व बालविकास प्रकल्पाअंतर्गत दशसूत्री कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अंगणवाडीचे उदघाटन पंचायत समिती सदस्य ...

Smart Anganwadi is the need of the hour: Suryavanshi | स्मार्ट अंगणवाडी ही काळाची गरज : सूर्यवंशी

स्मार्ट अंगणवाडी ही काळाची गरज : सूर्यवंशी

मोहोळ तालुक्यातील औंढी येथे महिला व बालविकास प्रकल्पाअंतर्गत दशसूत्री कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अंगणवाडीचे उदघाटन पंचायत समिती सदस्य माऊली चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गावातील शिष्यवृत्ती परीक्षा पास झालेल्या ५ विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य सेविका, आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सत्कार केला. याप्रसंगी अंगणवाडी लाभार्थ्याना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. यावेळी अंगद भुसे, ग्रामसेवक माने, सरपंच शांतीलाल आंबुरे, उपसरपंच प्रकाश बचुटे, पोलीस पाटील सीताराम भुसे, प्रशांत बचुटे, बंडू भुसे, एकनाथ माळी, विनोद जगधने, अजय विभुते, आरोग्य विभागाचे कांबळे, जाधवर आदी उपस्थित होते.

.........

औंढी अंगणवाडी येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी, माऊली चव्हाण, शिवाजीराव सोनवणे, अंगद भुसे आदी.

...........

फोटो १८कामती

Web Title: Smart Anganwadi is the need of the hour: Suryavanshi