नर वानराच्या धुमाकुळामुळे नागरिकांची उडाली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:27+5:302021-08-21T04:26:27+5:30
हा नर वानर शेळ्यांच्या मागे धावत सुटतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्याकडून शेळ्यांवर हल्ल्या होण्याची भीती वाटू लागली आहे. या वानराने ...

नर वानराच्या धुमाकुळामुळे नागरिकांची उडाली झोप
हा नर वानर शेळ्यांच्या मागे धावत सुटतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्याकडून शेळ्यांवर हल्ल्या होण्याची भीती वाटू लागली आहे. या वानराने अद्याप माणसांवर हल्ला केल्याची घटना घडली नाही. परंतु दोन-तीन इतर वानरापासून भरकटल्यामुळे सैरभैर झाला आहे. हा वानर रात्री-अपरात्री पत्र्याच्या घरांवर इकडून तिकडे उड्या मारत असल्याने नागरिकांना रात्रीची झोपही नीट लागत नाही. त्याला हुसकावून लावावे तर हल्ला होण्याच्या भीतीने नागरिकही पुढे येण्यास घाबरत आहेत.
सध्या हा नर वानर गोडसेवाडी, आदलिंगे मळा परिसरात फिरत आहे. याबाबत बंडू आदलिंगे यांनी सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधून या वानराला पकडून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
कोट :::::::::::::::
आदलिंगे मळा येथील नागरिकांची याबाबत तक्रार आली आहे. तो इतर वानरांपासून भरकटल्यामुळे सैरभैर झाला असावा. वनविभागाकडून त्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला जाईल. नागरिकांनी घाबरू न जाता तो दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधावा.
- देवकर
वनपाल, सांगोला