शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

सहाशे सायकलस्वार जाहले विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य धन्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:53 IST

नाशिक ते पंढरपूर ३४० किलोमीटरची सायकलस्वारी; ६०० सदस्य पंढरपुरात दाखल

ठळक मुद्देनाशिक येथील सायकलिस्ट संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी आषाढी वारी सोहळ्यापूर्वी सायकल वारीप्रवासादरम्यान ‘सायकल चालवा, इंधन वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, निरोगी राहा, प्लास्टिक बंदी करा, बाललैंगिक अत्याचार थांबवा’, असे संदेशएकसारखा रंग,  एकसारखी सायकल, रस्त्याच्या एकाच बाजूने एका रांगेत, शिस्तीने मार्गस्थ होतानाचे दृश्य सर्वांना आकर्षित करून घेते़

करकंब : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन अनेक भाविक पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. रविवारी नाशिक ते पंढरपूर हे ३४० किमीचे अंतर पार करीत ६०० सदस्यांची सायकलवारी पंढरीत दाखल झाली़ यातील काही सदस्य हे वर्षभर, सहा महिने तर किमान दोन महिने तरी सराव केल्यानंतरच या सायकलवारीत सहभागी होतात, असे समीर मुळे,  सुधीर कराड, सुधीर शिंदे यांनी सांगितले.

नाशिक येथील सायकलिस्ट संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी आषाढी वारी सोहळ्यापूर्वी सायकल वारी काढली जाते. प्रवासादरम्यान ‘सायकल चालवा, इंधन वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, निरोगी राहा, प्लास्टिक बंदी करा, बाललैंगिक अत्याचार थांबवा’, असे संदेश दिले जातात़ सर्व सदस्यांचा एकसारखा रंग,  एकसारखी सायकल, रस्त्याच्या एकाच बाजूने एका रांगेत, शिस्तीने मार्गस्थ होतानाचे दृश्य सर्वांना आकर्षित करून घेते़, असे अनंत  झंवर, डॉ़ गणेश कोळपे यांनी सांगितले.

आठव्या वर्षी नाशिक येथून २८ रोजी ही सायकल वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली़ पहिल्या दिवशी १५० किलोमीटरचे अंतर पूर्ण करून अहमदनगर येथे मुक्कामी आली़ दुसºया दिवशी २९ रोजी १४५ किलोमीटरचे अंतर पार करून टेंभुर्णी येथे मुक्काम केला़ त्यानंतर ३० रोजी टेंभुर्णी ते पंढरपूर असे ४५ किलोमीटरचे अंतर पार करीत सकाळी ११ वाजता पंढरीत दाखल झाली.

नाशिक सायकलिस्टच्या वतीने प्रेसिडेंट प्रवीण कांबीया यांच्या मार्गदर्शनाखाली या वारीचे नियोजन करण्यात येते़ या सायकलवारीत ६०० सदस्यांमध्ये पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचाही समावेश असतो़ या सायकलिस्ट संघटनेत डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक आणि व्यावसायिकांचा समावेश असतो.

सामाजिक संदेश- सायकलवारीच्या माध्यमातून  प्रत्येक वर्षी एक वेगळा सामाजिक संदेश घेऊन पंढरपूरला येतो. या वर्षीच्या वारीत नाशिक ते पंढरपूर मार्गावरील महाविद्यालयात आणि गावोगावी वाढत्या बाललैंगिक अत्याचार विरोधात मार्गदर्शन केल्याचे डॉ. मनीषा मुंदडा यांनी सांगितले.

सहा दृष्टीहीनांची सायकलवारी- प्रत्येक वर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम असतो़ यंदाच्या वर्षी सहा दृष्टीहीन सायकलस्वारांना नाशिक ते पंढरपूर सायकलवारीचा प्रवास घडविण्याचे ठरविले़ त्यानुसार सायकलीचेच आणखी एक चाक जोडून एकाच सायकलीला जोडली़ पुढे दृष्टी असलेली व्यक्ती सायकल चालविते तर मागे दृष्टीहीन व्यक्ती केवळ पायडल हलवून पुढील व्यक्तीला मदत करतो़ असे सहा दृष्टी सदस्यांनी नाशिक ते पंढरपूर अशी सायकलवारी पूर्ण केली आहे.

नियमावली अन् दैनंदिनी...- नाशिक सायकलिस्ट संघटनेने सदस्यांसाठी नियमावली स्पष्ट केली आहे़ पिण्याचे पाणी सोबत आपल्याच बॉटलमध्ये घ्यावे़ तीन दिवसांच्या कालावधीत दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, मावा याचे सेवन करायचे नाही़ रस्त्यावरून सर्वांनी एका रांगेत जायचे़ आपल्यामुळे दुसºयांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची़ प्रवासादरम्यान मोबाईलवर बोलायचे नाही, अशी ही नियमावली आहे़ शिवाय रोज पहाटे ५ वाजता उठून ६ वाजता ३० किमी सायकल वारी करणे त्यानंतर चहा, नंतर ३० किमी अंतर पार केल्यानंतर नाश्ता, पुन्हा ३० किमी अंतर पूर्ण केल्यानंतर थोडी विश्रांती़ पुन्हा १५ किमी अंतर पूर्ण केल्यानंतर दुपारचे जेवण़ त्यानंतर २० किमी अंतर पूर्ण केल्यावर दुपारचा चहा आणि शेवटी २० किमीचे अंतर पार केल्यानंतर रात्रीचे जेवण आणि मुक्काम.

सायकल वारीत सहभाग नोंदविलेल्या अवघ्या नऊ वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला़ त्यामुळे यंदाच्या सायकलवारीत आम्ही शोकाकुल आहोत़ परिणामी यावर्षी पंढरपूर येथील सायकल रिंगण सोहळा आम्ही रद्द केला आहे़               - हरीश बैजल, सदस्य, नाशिक सायकलिस्ट

आमच्या सोबत साहित्य घेऊन ८ ट्रॅव्हल्स आणि ७ ट्रक आहेत़ शिवाय स्वयंपाकीही आहेत़ दुपारच्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची सोय केली जाते़ पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर परत ट्रॅव्हल्सने जातो़ शिवाय सायकली ट्रकमधून परत नेल्या जातात़ - सुधीर कराड, शिक्षक सदस्य

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर