एकमेकींना कधीही न पाहिलेल्या सहाजणींनी घेतली कडकडून गळाभेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:20 AM2021-02-14T04:20:56+5:302021-02-14T04:20:56+5:30

हे स्नेहसंमेलन शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे नव्हे तर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मैत्रीणींनी आयोजित केले होते. अनिता लवंगरे यांनी ...

The six, who had never seen each other, hugged each other tightly | एकमेकींना कधीही न पाहिलेल्या सहाजणींनी घेतली कडकडून गळाभेट

एकमेकींना कधीही न पाहिलेल्या सहाजणींनी घेतली कडकडून गळाभेट

Next

हे स्नेहसंमेलन शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे नव्हे तर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मैत्रीणींनी आयोजित केले होते. अनिता लवंगरे यांनी खास महिलांसाठी तयार केलेला हास्यसंवाद ग्रुप आहे. या ८० जणींच्या ग्रुपमधील चॅटिंगद्वारे सहाजणींचे विचार आणि मने जुळली. त्यातून त्यांचे घट्ट मैत्रीत रूपांतर झाले. चॅटिंगमधून ख्यालीखुशालीची विचारपूस सुरू झाली.

जमलेल्या मैत्रिणींनी एकत्र येऊन समक्ष ओळख करून स्नेहसंमेलनचा आनंद घेऊ, अशी एकमेकींमध्ये कल्पना मांडली आणि ती सर्वांनी उचलून धरल्यानंतर सासवड येथील ज्योती गिरी हिने आपल्या घरी बोलावले. प्रापंचिक अडचणीतून वेळ काढून या महिला अखेर एकत्र आल्याच.

व्हॉट्सॲपवरून रोज संपर्कात असतोच, मजा येते. या संमेलनासाठी ज्या मैत्रीणींनी पुढाकार घेतला, त्यात अनिता लवंगरे, ज्योती गिरी, स्मिता गिरमे, अलका गंगाखेडर, अलका चलवदे, प्रिया गुरव यांनी हे संमेलन यशस्वीपणे पार पडले.

रिफ्रेश होऊन घेतला निरोप

वेगवेगळ्या गावातून काही महिलांनी प्रापंचिक पाश बाजूला ठेवून एकत्र येत सासवड येथे आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनचा तीन दिवस आनंद घेतला. नंतर या महिला जड अंतःकरणाने मात्र ‘रिफ्रेश’ होऊन एकमेकींचा निरोप घेऊन आपापल्या गावी परतल्या.

फोटो लाईन ::::::::::::::::::::

व्हॉटस‌्अपद्वारे मैत्री करून सासवड येथे एकमेकींना भेटलेल्या सहा मैत्रीणी.

Web Title: The six, who had never seen each other, hugged each other tightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.