पांगरीत सहा बिनविरोध, नऊ जागांसाठी थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST2021-01-13T04:56:24+5:302021-01-13T04:56:24+5:30

सध्या या ग्रामपंचायतीवर माजी आ़ दिलीप सोपल गटाची सत्ता आहे़ त्यापूर्वी आ़ राजेंद्र राऊत गटाची सत्ता होती़ ...

Six unopposed in Pangri, fighting directly for nine seats | पांगरीत सहा बिनविरोध, नऊ जागांसाठी थेट लढत

पांगरीत सहा बिनविरोध, नऊ जागांसाठी थेट लढत

सध्या या ग्रामपंचायतीवर माजी आ़ दिलीप सोपल गटाची सत्ता आहे़ त्यापूर्वी आ़ राजेंद्र राऊत गटाची सत्ता होती़ गावकरी आलटून-पालटून एकमेकांना काम करण्याची संधी देतात असा येथील निवडणुकीचा अनुभव आहे़ त्यामुळे यावेळी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत़ गावात पाच प्रभागात मिळून १५ जागा आहेत़ ५३३६ मतदान आहे़ त्यापैकी प्रभाग १ मधील तीन जागा तर प्रभाग ४ मधील एक आणि प्रभाग ५ मधील दोन अशा सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत़

आ़ राजेंद्र राऊत प्रणित लोकनेते रघुनाथदादा पाटील आघाडीचे नेतृत्व हे ॲड. अनिल पाटील, सुहास देशमुख, संजय बगाडे, विलास जगदाळे, विजय गरड, विजय गोडसे, विजय माळी हे करीत आहेत़ या पॅनलने नऊ जागी उमेदवार उभे केले आहेत़ माजी आ़ दिलीप सोपल गटाची धुरा ही डॉ़ अरुण नारकर, रामभाऊ देशमुख, साहेबराव पवार, बाबा जाधव, दीपक शेळके, धनंजय तौर, झेडपी सदस्य रेखा राऊत, संतोष चव्हाण यांच्या खाांद्यावर आहे़ यांनी पाच जागा उभ्या केल्या आहेत़ सोपल समर्थकच विकास आघाडीचे चार उमेदवारदेखील स्वतंत्रपणे लढत आहेत़

हे गाव मोठे असल्याने रिक्षा व टमटमद्वारे प्रचार केला जात आहे़ आता पदयात्रांनादेखील सुरुवात झाली आहे़ गावात अठरापगड जातींच्या लोकांची संख्या ही जास्त आहे़ बहुजन व मुस्लीम समाजदेखील जास्त आहे़ त्यामुळे तो समाज कोणाकडे झुकतो यावर निकालाचे गणित अवलंबून आहे़

Web Title: Six unopposed in Pangri, fighting directly for nine seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.