सहा जणांनी दिली पिता-पुत्रीला जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:21 IST2021-05-16T04:21:09+5:302021-05-16T04:21:09+5:30

सोनंद (ता. सांगोला) येथील कृष्णदेव अभंगराव बोराडे आणि त्यांची मुलगी विजया हे दोघे जण दुचाकीवरून दळण घेऊन घरी जात ...

Six threaten to kill father and daughter | सहा जणांनी दिली पिता-पुत्रीला जीवे मारण्याची धमकी

सहा जणांनी दिली पिता-पुत्रीला जीवे मारण्याची धमकी

सोनंद (ता. सांगोला) येथील कृष्णदेव अभंगराव बोराडे आणि त्यांची मुलगी विजया हे दोघे जण दुचाकीवरून दळण घेऊन घरी जात होते. त्यावेळी सोनंद ते डोंगरगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ समोरून दोन चारचाकी वाहने त्यांच्याजवळ येऊन थांबली. वाहनातून शहाजी श्रीमंत काशीद, प्रवीण शंकर काशीद, पप्पू दत्तात्रय काशीद, बंडू साहेबराव काशीद, रोहन शिवाजी काशीद, जित्तू शंकर काशीद हे सहा जण खाली उतरले. त्यापैकी प्रवीण काशीद याने कृष्णदेव बोराडे यांच्याजवळ येऊन तुम्ही डीवायएसपी मॅडमला कोरडा नदीपात्रात कशाला घेऊन गेले होते, अशी विचारणा करीत कृष्णदेवची मुलगी विजया हिच्याजवळ जाऊन तुझ्या घरातील सर्वांना संपवून टाकेन, आमच्या नादी लागू नका, असे म्हणून दोघांना शिवीगाळ करून दमदाटी केली.

त्यानंतर शहाजी काशीद व पप्पू काशीद यांनी तलवारीने तुम्हाला संपवून टाकीन अशी धमकी दोघांना दिली. तर प्रवीण काशीद याने रिव्हॉल्व्हर हातात घेऊन आमच्याकडे अशी हत्यारे आहेत, आमचे कोणी काही वाकडे करणार नाही, तुम्ही जर यापुढे वाळूबाबत काही सांगितले तर तुमच्या घरातील सर्वांना बघून घेतो, अशी धमकी देऊन निघून गेले. याबाबत, कृष्णदेव बोराडे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी शहाजी काशीद, प्रवीण काशीद, पप्पू काशीद, बंडू काशीद, रोहन काशीद, जित्तू काशीद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Six threaten to kill father and daughter