पंढरपुरात मटका अड्यावर कारवाई, अडीच लाखांसह सहा जण ताब्यात

By Appasaheb.dilip.patil | Updated: August 1, 2017 18:11 IST2017-08-01T18:11:08+5:302017-08-01T18:11:24+5:30

पंढरपूर दि १ :  शहरातील विविध ठिंकाणी असलेल्या मटका आड्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने धाडी टाकुन २ लाख ८७ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेतले आहे.

Six persons, including two and a half lakh, were arrested in Bandhapur in Bandhapur | पंढरपुरात मटका अड्यावर कारवाई, अडीच लाखांसह सहा जण ताब्यात

पंढरपुरात मटका अड्यावर कारवाई, अडीच लाखांसह सहा जण ताब्यात


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि १ :  शहरातील विविध ठिंकाणी असलेल्या मटका आड्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने धाडी टाकुन २ लाख ८७ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेतले आहे.
पंढरपूर येथे अवैध्य धंदे सुरु असल्याबाबत पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांचेकडे तक्रारी देण्यात आल्या होत्या. यामुळे सोलापूर येथील विशेष पथक पंढरपूर येथे रवाना झाले होते. या पथकामध्ये पो.स.ई गणेश निंबाळकर , पोहेकॉ. मनोहर माने, पोकॉ. अमोल माने, पोकॉ. विलास पारधी, पोकॉ. श्रीकांत जवळगे, पोकॉ. सिध्दाराम स्वामी, पोकॉ. अक्षय दळवी, पोकॉ. विष्णू बडे यांचा सहभाग आहे.
हे पथक पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सोमवारी रात्री आठच्या सुमारास पंढरपूर बस स्टँड समोरील मिलन शाँप, मारूती मंदीराच्या आडोशाला व इंदिरा गांधी भाजी मार्केट येथे मयका सुरु असल्याचे त्यांना दिसून आले. या मटका आड्डयांवर छापा टाकून अरूण गोपाळ संत, सतिश मारूती कांबळे, भारत लक्ष्मण आळंदे, सतिश विठ्ठल माने, महेश दत्ताञय सुरवसे, नवनाथ चंद्रकांत बोडके (सर्व रा पंढरपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटक्याचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण २ ,८७,५०० रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सापडलेल्या आरोपी कडे मटका मालकाबाबत चोकशी करीता बाळू सुरेश अधटराव व युवराज सिकंदर कोथाळकर दोघे रा पंढरपूर असे असल्याचे समजल्याने सर्व ८ आरोपी विरूद्ध पंढरपूर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Six persons, including two and a half lakh, were arrested in Bandhapur in Bandhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.