शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूला चकवा...! जीप सात वेळा पलटी होऊनही सहा जण बचावले

By दिपक दुपारगुडे | Updated: May 12, 2024 18:18 IST

अपघातात दोघी बहिणींनी प्रत्यक्ष मृत्यूचा थरार अनुभवला.

सोलापूर : सोशल मीडियावरचे अपघाताचे काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करतात. सामान्य नागरिकांना आश्चर्य वाटतं यात काही नवल नाही, पण कधीकधी असे व्हिडीओ तोंडात बोटं घालायला लावतात. जीप सातवेळेस पलटी होऊनही तीन चिमुकल्यासह सहा जण बचावले आहेत. मृत्यूला चकवा देणारी ही घटना पंढरपूर तालुक्यात करकंब या गावाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

अपघातात दोघी बहिणींनी प्रत्यक्ष मृत्यूचा थरार अनुभवला. यामुळेच काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. मंगळवेढा तालुक्यात भोसे येथील बंडू जगताप यांच्या शुद्धी जगताप (वय १०), स्वरा जगताप (वय ८) या दोन्ही मुली उन्हाळी सुट्टीसाठी आत्याच्या गावी पुणे येथे जात होत्या. या गाडीमध्ये दोन महिला, एक मुलगा व तीन मुली होत्या. 

करकंबजवळ एका पेट्रोल पंपासमोर जीपमध्ये अचानक बिघाड होऊन काही सेकंदात ती सातवेळा पलटी झाली. या भीषण अपघातात रमेश गायकवाड हे बाहेर फेकले गेले व रस्त्यावर डोके आपटल्याने काही क्षणात गतप्राण झाले. मात्र जीपमधील शुद्धी, स्वरा या दोघी बहिणी फुटलेल्या काचेतून सुखरूप बाहेर आल्या. परी गायकवाड ही चिमुकलीसह इतरांना बाहेर येण्यास मदत केली. तसेच इतर दोन महिला, एक मुलगा, एक मुलगी असे चौघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही बहिणींनी मृत्यूचा थरार पहिला.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात