शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

फेब्रुवारीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 12:32 IST

सोलापूर : केंद्र शासनाच्या उडान योजनेत पुन्हा सोलापूरचा समावेश झाला असून, फेब्रुवारी महिन्यात सोलापूर- मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत ...

ठळक मुद्दे केंद्र शासनाच्या उडान योजनेत पुन्हा सोलापूरचा समावेशसिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पुन्हा रडारवर आली एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाºयांनी होटगी रोड विमानतळाची पाहणी

सोलापूर : केंद्र शासनाच्या उडान योजनेत पुन्हा सोलापूरचा समावेश झाला असून, फेब्रुवारी महिन्यात सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी हटविल्याखेरीज ही सेवा सुरू होणार नसल्याचे एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारखान्याची चिमणी पुन्हा रडारवर आली असून, चिमणीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी सोलापुरातील उद्योजकांनी केली आहे. 

केंद्र शासनाने २०१६ मध्ये उडान योजना जाहीर केली. यात सोलापूरचाही समावेश होता. उडान योजना जाहीर झाल्यानंतर सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाºयांनी होटगी रोड विमानतळाची पाहणी केली. त्यात त्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याचा अहवाल दिला. 

त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला चिमणी हटविण्याबाबत नोटीस दिली. जून २०१७ मध्ये यासंदर्भात कारवाई सुरू केल्यानंतर कारखान्यातील कामगारांनी आंदोलन केले. 

हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला. मुख्यमंत्र्यांनी या कारवाईला स्थगिती दिली. यानंतर कारखाना प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली. आॅक्टोबर २०१७ मध्ये कारखान्याच्या कामगार मंडळाने उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून चिमणी कारवाईला स्थगिती मागितली. कारखाना प्रशासन आणि कामगार मंडळाची याचिका आॅगस्ट २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिकेला पत्र पाठवून चिमणी पाडण्याच्या कारवाईबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. 

१७ आॅक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौºयावर आले. दुष्काळी परिस्थिती आणि उसाचे अतिरिक्त क्षेत्र यामुळे यावर्षी चिमणीला पुन्हा अभय देत असल्याचे सांगितले. परंतु, कारखान्यानेपर्यायी चिमणी उभारण्याचे काम सुरू करावे, असे त्यांनी सांगितले होते. 

दरम्यान व्यावसायिकांबरोबरच कार्पोरेट कंपन्यांच्या सोलापूरातील अधिकाºयांनाही विमान सेवेची प्रतीक्षा असून, कंपन्यांच्या बैठकासाठी त्यांना मुंबईला जावे लागत असल्याने विमान सेवा सोयीची होणार आहे.

सहा महिन्यांपूर्वी वगळले, आता पुन्हा- सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर होत नसल्याने उडान योजनेतून सोलापूरला वगळण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जानेवारी रोजी सोलापुरात घेतलेल्या जाहीर सभेत उडान योजनेतून सोलापुरात विमानसेवा सुरू होईल, असे जाहीर केले. त्यानंतर मंत्रालयातून हालचाली झाल्या आणि उडान योजनेत पुन्हा सोलापूरचा समावेश झाल्याचे वृत्त आले.

फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू होणार असेल तर आनंदच आहे. पण एअरपोर्ट आॅफ अ‍ॅथॉरिटीने चिमणीचा अडथळा दूर केल्याशिवाय विमानसेवा सुरू करता येणार नाही, हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्याशिवाय डीजीसीए परवानगी देणार नाही. प्रथम त्यासंदर्भात काम झाले पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. - केतन शहा, सचिव, चेंबर आॅफ कॉमर्स. 

उडान योजनेत पुन्हा समाविष्ट झाल्यामुळे सोलापूरला पुढे जाण्याची चांगली संधी मिळाली आहे. मुंबईला जाणाºया दोन रेल्वेतील एसी कोच भरून असतात. आमच्या हॉटेलसह शहरातील इतर मोठ्या हॉटेलमधील ५० टक्क्यांपेक्षा जास्त रूम नियमितपणे बुक असतात. अशा परिस्थितीत सोलापुरातून सुरू होणाºया विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, याची शाश्वती आहे. त्यामुळे विमानसेवेतील अडथळे दूर झाले पाहिजेत. - राम रेड्डी, उद्योजक, सोलापूर. 

पर्यायी चिमणीचे काम नाहीच? मुख्यमंत्र्यांनी जून २०१७ मध्ये चिमणीच्या पाडकामाला स्थगिती देताना कारखान्याने पर्यायी चिमणी उभारण्याच्या कामाला सुरुवात करावी, असे सांगितले होते. जानेवारी २०१८ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत जिल्हाधिकाºयांनी कारखाना व्यवस्थापन आणि एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाºयांच्या समन्वय बैठका घडवून आणल्या. पण कारखान्याने पर्यायी चिमणी उभारण्यास अद्यापही सुरुवात केलेली नाही. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीने पर्यायी जागा सुचवावी, यावर कारखाना व्यवस्थापन अडून आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरAirportविमानतळMumbaiमुंबईAir Indiaएअर इंडिया