शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

जिवंतपणीच सिद्धव्वांनी करुन ठेवली आपल्या अंत्यसंस्काराची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 12:54 IST

जगण्याआधीच बचत... मरणानंतरच्या विधीसाठी : अखेरच्या श्वासापर्यंत केवळ लेकरांचाच केला विचार !

ठळक मुद्देसिद्धव्वांच्या उशीखालीच जमा झालेली पैशाची ती कापडी पिशवी असायचीमृत्यूच्या ८ दिवस ती पिशवी चुकून खाली पडली. लहान मुलगा अशोकने ती पिशवी पुन्हा आईच्या उशीखाली ठेवून दिली सिद्धव्वाने मुलींकडे ३० हजार रुपये जमा केले ते स्वत:च्या अंत्यविधीसाठीच

रेवणसिध्द जवळेकर

सोलापूर : कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतं... किती त्रास द्यावा एखाद्याला, यालाही काही प्रमाण असते...आपल्यावरुनच विचार करावा, समोरच्यालाही मन असतं... कदाचित हा मंत्र जपत हयातीतच अंत्यसंस्काराची तजवीज करून ठेवताना सिद्धव्वा गुरुनाथ हरवाळकर या ८० वर्षीय वृद्ध मातेने जगाचा निरोप घेताना मतिमंद मुलासह दोन लेकरांचाच विचार केला; म्हणूनच तिने बचत केलेले पैसे तिच्याच अंत्यविधीला खर्च करण्यात आले.

पुरवठा खात्यात निरीक्षक म्हणून काम केलेले त्यांचे पती गुरुनाथ यांचे २३ वर्षांपूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर सिद्धव्वा यांनी धीर न सोडता शास्त्रीनगर भागात त्यांनी लाकडाचा अड्डा चालवत संसाराचा गाडा नेटाने पुढे नेला. त्यांचा एक मुलगा नागनाथ हा मतिमंद असून तो अविवाहित आहे. 

दुसरा मुलगा अशोक हा एका कंपनीत शिपाई म्हणून कार्यरत आहे. लक्ष्मीबाई शिवचलप्पा मैंदर्गीकर, सरोज परमेश्वर माशाळे आणि मंगल अंकुश नागनाळे या तीन लेकींच्या संसाराला गती देण्याचे कामही सिद्धव्वा यांनी आपल्या हयातीत केले. पती गेले अन् उद्या-परवा आपण गेल्यावर दोन्ही मुलांचं काय ? त्यातच १० वर्षांपूर्वी सिद्धव्वावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून त्या सुखरुप झाल्या होत्या. आता आपण काही दिवसच आहोत, असा भास त्यांना होऊ लागला म्हणून त्या पतीच्या निधनानंतर येत असलेल्या पेन्शनमधील कधी शंभर तर कधी पाचशेची नोट गुंडाळून एका कापडी पिशवीत टाकून द्यायच्या. हेच पैसे आपल्या अंत्यविधीसाठी कामाला येतील, असे त्यांनी लेकींसमोर बोलूनही दाखवले होते. 

पैशाची ती पिशवी उशीखालीच राहायची !- सिद्धव्वांच्या उशीखालीच जमा झालेली पैशाची ती कापडी पिशवी असायची. मृत्यूच्या ८ दिवस ती पिशवी चुकून खाली पडली. लहान मुलगा अशोकने ती पिशवी पुन्हा आईच्या उशीखाली ठेवून दिली. त्यात नेमके काय याची कल्पनाही अशोकला नव्हती. गेल्या राखीपौर्णिमेला तीन लेकी आणि नातवंडे घरी आली होती. त्यावेळी सिद्धव्वाने बचत केलेल्या पैशाचे काय करायचे हे सांगताना लेकीसह मुलगा अशोक, त्याची पत्नी कल्पना आणि अन्य मंडळी गहिवरुन गेली. कापडी पिशवीतील रक्कम मोजली असता त्यात १४ हजार ४०० रुपये निघाले. पैकी ४०० रुपये तिने सर्वच नातवंडांना देऊन आपली शेवटची भेट दिली. याशिवाय सिद्धव्वाने मुलींकडे ३० हजार रुपये जमा केले ते स्वत:च्या अंत्यविधीसाठीच.

सिद्धव्वा या माझ्या सासू असल्या तरी त्या माझ्या आईच होत्या. एक मुलगा मतिमंद तर दुसºया मुलास अत्यल्प पगार. त्यांच्या निधनानंतर पेन्शन बंद होणार असल्याने मुलांचे काय होणार ? ही चिंता सिद्धव्वा यांना असावी. यामुळेच त्यांना त्रास नको म्हणून स्वत:च्या अंत्यविधीसाठी त्यांनी हयातीत पैसे बचत करण्याचा प्रकार थक्क करणारा आहे.-परमेश्वर माशाळे, जावई (बँक अधिकारी)

माझी आई सिद्धव्वा म्हणजे माझ्यासाठी एक संस्काराची वाट होती. ती नेहमी माझ्यासह माझ्या भावाचाच विचार करायची. तिच्या अंत्यविधीचा खर्च आमच्यावर येऊ नये, म्हणून त्या खर्चाची तरतूद हयातीत करणारी माझी आई म्हणजे साक्षात देवीच आहे.-अशोक गुरुनाथ हरवाळकर, चिरंजीव

टॅग्स :Solapurसोलापूर