सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकाम सुरू ? चार जणांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 16:59 IST2017-08-11T16:59:50+5:302017-08-11T16:59:53+5:30
सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळावर अडसर ठरणारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामास शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास सुरूवात करण्यात आली़

सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकाम सुरू ? चार जणांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळावर अडसर ठरणारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामास शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास सुरूवात करण्यात आली़ मात्र शेतकºयांच्या तीव्र विरोधामुळे चिमणी पाडकाम अद्याप तरी सुरू झाले नाही़ शेतकºयांचा आक्रमक पवित्रा पाहता सोलापूर शहर पोलीसांनी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त उभा केला आहे़ चिमणी पाडू नका या मागणीसाठी येथील चार शेतकºयांनी अंगावर रॉकेल ओतुन घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ चिमणी पाडकामाचे काम अद्याप सुरूच आहे़ आता संपूर्ण चिमणी पडणार की नाही याबाबत आतातरी काहीही सांगण्यात येत नाही़