सिद्धेश्वर कल्लूहोळेमठ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:22 IST2021-05-13T04:22:18+5:302021-05-13T04:22:18+5:30

सोलापूर : सुरवसे प्रशालेचे लिपिक सिद्धेश्वर गुरुसिद्धया कल्लूहोळेमठ (५३, रा. बुबने चाळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन ...

Siddheshwar Kalluhole Math passed away | सिद्धेश्वर कल्लूहोळेमठ यांचे निधन

सिद्धेश्वर कल्लूहोळेमठ यांचे निधन

सोलापूर : सुरवसे प्रशालेचे लिपिक सिद्धेश्वर गुरुसिद्धया कल्लूहोळेमठ (५३, रा. बुबने चाळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते नवरात्र महोत्‍सवाचे विरेश कल्लूहोळेमठ यांचे वडील होत.

धानम्मा उमदी

अक्कलकोट : धानम्मा मल्लिकार्जुन उमदी (८०, रा. नागणसूर, त. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पेपर विक्रेत मल्लिकार्जुन अतनुरे यांच्या सासू होत.

बसवणप्पा म्हेत्री

अक्कलकोट : प्रगतिशील बागायतदार बसवणप्पा भिमशा म्हेत्री (७९, रा. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते माळी समाजाचे खजिनदार राजेंद्र लिंबीतोटे यांचे सासरे होत.

रत्नाबाई धारसंगे

अक्कलकोट : रत्नाबाई अंब्बण्णा धारसंगे (७०, रा. केगाव बु. ता. अक्कलकोट)

यांचे निधन झाले. प्रगतिशील शेतकरी श्रीशैल धारसंगे यांच्या त्या मातोश्री होतं. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे.

सईदाबानो महाजन

सोलापूर : सईदाबानो जहिरोद्दीन महाजन (६९, रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Siddheshwar Kalluhole Math passed away