शुभराय महाराजांचा रथोत्सव उत्साहात

By Admin | Updated: July 10, 2014 01:35 IST2014-07-10T01:35:31+5:302014-07-10T01:35:31+5:30

२२९ वर्षांची परंपरा : दर्शनासाठी गर्दी

Shubhariya Maharaj's Rathod celebrated | शुभराय महाराजांचा रथोत्सव उत्साहात

शुभराय महाराजांचा रथोत्सव उत्साहात



सोलापूर : चिमप्पा रामदासी गुरुंच्या आदेशावरून पंढरपूरहून सोलापुरात आलेल्या शुभराय महाराजांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात काढण्यात आला. २२९ वर्षांची परंपरा असलेल्या या पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील नियोजित मार्गावर लोकांनी मोठी गर्दी केली होती.
आषाढी एकादशीनिमित्त सकाळी ६ पासून दत्त चौकातील शुभराय मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ च्या दरम्यान ११ गुरुजनांसह पांडुरंग व श्री कृष्णाच्या मूर्तीस विद्यार्थ्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भजनी मंडळांनी भजन सादर केले. दुपारी १२.३0 वा. रथामध्ये श्री कृष्णाची मूर्ती आणि पालखीमध्ये शंकर महाराजांचा फोटो आणि शुभराय महाराजांच्या पादुका ठेवून आरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजता दत्त चौक येथून पालखीला प्रारंभ झाला. रथोत्सवाच्या पुढे हलगीनाद, बॅन्जो त्यानंतर पालखी विद्यार्थ्यांच्या रांगा आणि शेवटी रथ होता. पालखी दत्त चौक, नवीपेठ, फॅशन कॉर्नर, चौपाड, विठ्ठल मंदिर, पंजाब तालीम, मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, चाटी गल्ली, भांडे गल्ली, सराफ कट्टा, माणिक चौक, जुनी फौजदार चावडी, खाटीक मशिद मार्गे पुन्हा सायंकाळी दत्त चौक येथे विसर्जित करण्यात आली. या रथोत्सवात शुभांगी बुवा, शुभराज बुवा, ऋतुजा बुवा, अमृता बुवा, सुहास परिचारक, शोभना परिचारक, चंद्रिका चव्हाण, बाळकृष्ण भावे, अंबादास खिलारे, राजू खिलारे, नरेंद्र भावे, पाखर संकुल आणि उद्योग वर्धिनीचे सर्व कर्मचारी यांचा समावेश होता.

--------------------
परंपरा कायम...
रथ ओढण्यासाठी सोमवंशीय क्षत्रिय समाजाच्या परंपरागत मानकऱ्यांनी यंदाही रथ ओढून रथोत्सव पार पाडला. यामध्ये संजय दास, लक्ष्मीकांत छत्रबंद, अनिल दत्तात्रय छत्रबंद, अमर गुमठे, माणिकराव छत्रबंद, अरुण कांबळे आदींचा सहभाग होता.

Web Title: Shubhariya Maharaj's Rathod celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.