शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१५ मार्चपासून ४५ दिवस बंद राहणार विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 16:19 IST

दिवसभरात फक्त पाच तास विठ्ठलाचे मुख्य दर्शन भाविकांना घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.

सचिन कांबळे  

सोलापूर / पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिरात विकास कामे सुरू आहेत. या कामादरम्यान मूर्तीला धोका निर्माण होऊ नये, मूर्ती सुरक्षित राहावी. यासाठी १५ मार्च पासून दीड महिना पदस्पर्श बंद राहणार आहे. तर दिवसभरात फक्त पाच तास विठ्ठलाचे मुख्य दर्शन भाविकांना घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षते खाली भक्त निवास येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद,  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन लंगुटे, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, शकुंतला नडगिरे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फारशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुढील तीन महिने विठ्ठलाचे दररोज ५ तास मुखदर्शन सुरू असणार आहे. तसेच विट्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे. मंदिरातील आणि खास करू विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी १५ मार्च पासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे. साधारण ४५ दिवसाचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ५ जून पर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे.  त्यामुळे आता भाविकांना ३० फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे. तर पुढील ४५ दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही. यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर