शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

'तो' दुकानदार 23 मार्चपासून होता सोलापुरात; सात हजारांपेक्षा जास्त व्यक्तींची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:26 IST

तेलंगी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप; बाहेर पडण्याचे केले आवाहन खासगी रुग्णालयातील 30 कर्मचाऱ्यांसह 85 लोकांना घेतले ताब्यात

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचा मृत्यूपोलिसांनी केला सोलापूर शहरातील काही भाग सील

सोलापूर : तेलंगी पाच्या पेटीतील एका प्रार्थनास्थळ च्या बाजूला असलेल्या घरामध्ये मरण पावलेली व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याची माहिती कळताच संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला आहे विशेष म्हणजे संबंधित दुकानदार 23 मार्च पासून सोलापुरात होता हेही उघडकीस आले आहे त्यामुळे या परिसरातील सात हजारांपेक्षाही जास्त लोकांची तपासणी होणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. 

स्थानिक नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान जोडबसवांना चौक व पद्मशाली चौकाकडून अचानक पोलीस गाड्या येण्यास सुरुवात झाली.तेलंगी पच्चा पेठ येथील एका प्रार्थना तळाच्या बाजूला असलेल्या घराजवळ पोलिसांच्या गाड्या थांबल्या. दरम्यान, तत्काळ जोड बसवांना चौक ते जमखंडी फुल पोलिसांनी बंद केला.

शासकीय रुग्णालयाचे रुग्णवाहिका वाजत दाखल झालेले पोलिसांनी तत्काळ सर्व परिसरातील केला. दरम्यान शासकीय रुग्णालयाचे आणखी एक रुग्णवाहिका तेलंगी पछा पेठ येथे दाखल झाली. रुग्णवाहिकेतून पीपी किट घातलेले डॉक्टर, नर्सेस आणि ब्रदर्स खाली उतरले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वजण पूर्ण पॉझिटिव्ह निघालेल्या मृत व्यक्तीच्या घरी गेले. घरातील नातेवाईक व परिसरातील लोकांशी चर्चा केली. घरातील मृतांची पत्नी मुले व अन्य नातेवाइकांना रुग्णवाहिकेत बसून तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

पोलिसांनी जोडबसवांना चौक, अकबर कासिम मस्जिद, जमखंडी पूल, मेहबूब हॉटेल, आचार्य रंगा चौक आदी परिसर सील करून टाकला. या परिसरामध्ये एकाही व्यक्तीला आज सोडले जात नव्हते. पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरामध्ये बंदोबस्तासाठी लावण्यात आला होता. या पहिल्या बळीमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य