शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; सोलापुरातील घटना

By appasaheb.patil | Updated: September 22, 2022 16:50 IST

प्रियकर व मयताची पत्नी दोघांना सोलापूर शहर पोलिसांनी केली २४ तासात अटक

सोलापूर :  जुने विडी घरकुल, सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला होता. या खूनाच्या अनुषंगाने शहर पोलिस दलाची संपूर्ण टीम आरोपीच्या शोधासाठी परिपूर्ण तपास करीत होती. दरम्यान, प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकर, खून झालेल्या तरूणाची पत्नी यास अटक केली आहे. 

बाबासो जालींदर बाळशंकर (वय २७ वर्षे, रा. डोंबरजवळगे, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर व अरुणा दशरथ नाराणकर (वय २९ वर्षे, रा. जुने विडी घरकुल, सोलापूर ) यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मयत दशरथ नागनाथ नारायणकर व त्याची पत्नी अरुणा नारायणकर यांच्याबाबत घटनास्थळावरुन तसेच त्यांचे मुळ गाव डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथून  गोपनीय बातमीदारांकडून माहिती प्राप्त केली.  तपास पथकातील पोलीस अंमलदार यांचा संशय मयताची पत्नी अरुणा नारायणकर हिच्या कडे वळाला. मयताची पत्नी अरुणा नारायणकर हिचे प्रेमसंबंध बाबासो जालींदर बाळशंकर याच्याशी असल्याची माहिती मिळविली. बाबासो जालोदर बाळशंकर हा अरुणा नारायणकर हिला वारंवार भेटल्याची माहिती मिळाली. तसेच घटनेच्या दिवशीही सकाळी बाबासो बाळशंकर यास घटनास्थळाजवळ लोकांनी पाहिल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर क्षीरसागर यांनी बाबासो जालींदर बाळशंकर याचे मोबाईल नंबर बाबत माहिती मिळविली. त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळुन आल्यानं त्याच्यावर अधिकच संशय बळावला. त्यानंतर संशयिताबाबत अधिक माहिती घेतली असता, तो देखील डोंबरजवळगा, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे राहत असल्याचे समजले. तसेच घटना घडलेल्या रात्री तो त्याच्या राहत्या घरी नव्हता अशीही माहिती पोलिसांना मिळाली. बाबासो बाळशंकर यास मुळेगाव क्रॉसरोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे सखोल आणि कौशल्यपूर्वक तपास केला असता बाबासो बाळशंकर याने अरुणा नारायणकर हिचेशी गेली ७ ते ८ वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे कबुल केले. तसेच त्या प्रेमसंबंधातुन दशरथ नागनाथ नारायणकर याचा खुन मयताची पत्नी, अरुणा नाराणकर हिच्याशी संगणमत व कट करुन केल्याची कबुली दिली. 

त्या अनुषंगाने, सपोनि क्षिरसागर यांनी आरोपी बाबासो जालींदर बाळशंकर याचे मोबाईलची पाहणी केली असता, त्यामध्ये मयताची पत्नी, अरुणा नाराणकर हिने त्यास पाठविलेल्या व्हॉट्सॲप चॅटची माहिती मिळाली. त्या चॅटवरुन आरोपी बाबासो जालींदर बाळशंकर याने अरुणा नारायणकर हिचेशी संगणमत करून, कट रचून, खुनाची पुर्वतयारी साठी झोपेच्या गोळ्या, नायलॉन दोरी व चाकु खरेदी करुन, दशरथ नागनाथ नारायणकर याचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर, अरुणा नारायणकर हिचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता, तिने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, बाबासो बाळशंकर याचे मोबाईल मधील चॅट विषयी माहिती दिली असता, तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे बाबासो जालींदर बाळशंकर (वय २७ वर्षे, रा. डोंबरजवळगे, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर व अरुणा दशरथ नाराणकर (वय २९ वर्षे, रा. जुने विडी घरकुल, सोलापूर ) यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे करीत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी