शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; डोक्यात कुदळ घालून वस्तादने केला हॉटेल व्यवस्थापकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 16:23 IST

तुळजापूर - सोलापूर रोडवरील घटना: हॉटेलच्या पाठीमागील बाजूस पुरला मृतदेह

सोलापूर : सोलापूर - तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील एका हॉटेलच्या व्यवस्थापकाचा डोक्यात कुदळ घालून खून केल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. खून केल्यानंतर व्यवस्थापकाचा मृतदेह हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील झाडाखाली पुरण्यात आला होता.

कैलास आप्पानाथ परबळकर (वय ५० रा. शाहीर वस्ती भवानी पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. कैलास परबलकर हे हॉटेल सौरभ या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून व्यवस्थापक म्हणून काम करत होते. सात महिन्यापूर्वी या हॉटेलमध्ये आकाश मंडल नावाचा पश्चिम बंगाल येथील व्यक्ती वस्ताद म्हणून कामाला लागला होता.

२३ मार्च रोजी महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊन लागल्यामुळे हॉटेल बंद होते. बंद काळात आकाश मुंडुल हा हॉटेलमध्ये एकटा राहत होता. दिनांक १३ जून रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने हॉटेलला परवानगी दिल्यानंतर हॉटेल पुन्हा सुरू झाले होते. मात्र हॉटेलमध्ये जेवण विभाग हा बंद करण्यात आलेला होता, त्यामुळे दारूची पार्सल सोय करण्यात आलेली होती. पार्सलची सोय झाल्यामुळे हॉटेलचे व्यवस्थापक कैलास परळकर हे हॉटेलमध्ये पुन्हा कामाला येत होते. काही दिवसापासून ते रात्री हॉटेलमध्येच मुक्काम करत होते. शनिवारी रात्री व्यवस्थापक कैलास परबलकर व वस्ताद कैलास मुंडुल हे दोघे जेवण करून झोपले होते. रविवारी सकाळी दहा वाजता साफसफाई करणारा कर्मचारी कामाला आला, तेव्हा त्याला समोरून हॉटेल बंद असल्याचे दिसून आले. त्याने हॉटेलच्या पाठीमागील बाजूस जाऊन पाहणी केली असता दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.

हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असता आतमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे कामगाराने हॉटेल मालक राजू गुल्लापल्ली यांना फोन करून माहिती दिली. हॉटेलमध्ये कोणी नसल्याचे समजतात मालक राजू गुल्लापल्ली हे हॉटेलमध्ये आले. त्याने सर्वत्र पाहणी केली असता एका वस्तूवर त्यांना रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे त्यांना काहीतरी घातपात झाला असल्याचा संशय आला. राजू गुल्लापल्ली यांनी हॉटेलच्या पाठीमागील परिसरात  फिरून पाहणी केली असता त्यांना झाडाखाली जमिनीतून दोन पाय वर आलेले दिसले, त्यांनी तत्काळ तालुका पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेची माहिती दिली.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. हॉटेलचे व्यवस्थापक कैलाश परबलकर यांचा मुलगा आकाश परबळकर याला बोलावून घेतले. उरलेले प्रेत बाहेर काढल्यानंतर मुलाने ते प्रेत वडीलांचे असल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMurderखूनSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसtuljapur-acतुळजापूर