शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; मंगळवेढा तालुक्यात विषबाधेने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:21 IST

 मंगळवेढा : मरवडे (ता. मंगळवेढा) येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे दोन सख्या बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भक्ती आबासाहेब ...

 मंगळवेढा : मरवडे (ता. मंगळवेढा) येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे दोन सख्या बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भक्ती आबासाहेब चव्हाण ( वय- 06) व नम्रता आबासाहेब चव्हाण ( वय-04) या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने मरवडे गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मरवडे  येथील आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या भक्ती व नम्रता या लाडक्या लेकीसाठी मंगळवार दि.21 रोजी मंगळवेढा येथील दुकानातून खाऊ आणला होता. हा खाऊ खाल्यानंतर चव्हाण कुटूंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मंगळवेढा व पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले.  उपचारादरम्यान गुरुवार (दि.23) रोजी पहाटे आबासाहेब चव्हाण यांची मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू मंगळवेढा येथील खाजगी दवाखान्यात झाला तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू गुरुवारी मध्यरात्री पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान झाला. भक्ती ही मरवडे येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती. नम्रता ही बालवाडीत शिकत होती. भक्ती व नम्रता यांच्या गोड स्वभाव व हुशारीमुळे त्या सर्वांच्यात लाडक्या होत्या.

भक्ती व नम्रता यांच्यावर मरवडे येथील  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटूंबातील दोघी बहिणींचा अन्नातील विषबाधेने मृत्यू झाल्याने मरवडेत खळबळ उडाली असून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. मयत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत. या घटनेचा मंगळवेढा पोलीस ठाण्याकडून तपास केला जात आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस