शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; प्रवासासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देणाºया दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 13:23 IST

सोलापूर सायबर सेलची कारवाई; बनावट ग्राहक पाठवून माहिती आणली उघडकीस

ठळक मुद्देप्रवास करणाºया प्रवाशांना कोरोना नसल्याचे बनावट प्रमाणपत्र दिले़ शुभम ई-सेवा केंद्रावर पोलिसांनी गुरुवारी छापा मारलाताब्यातील दहा ते बारा कोरे वैद्यकीय प्रमाणपत्र जप्त केले़

सोलापूर : जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कलर झेरॉक्सच्या साह्याने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देणाºया दोन सख्ख्या भावांना शहर सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ त्यांच्याकडून दहा ते बारा बनावट प्रमाणपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. शुभम विजयकुमार एकबोटे, राहुल विजयकुमार एकबोटे (रा़  दोघे गुरुनानक चौक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांना गुरुनानक चौक येथील शुभम ई-सेवा केंद्रात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जातात, याची गुप्त माहिती मिळाली.़  त्या माहितीच्या आधारे त्यांनी बनावट ग्राहक पाठवून या माहितीची खात्री करून घेतली़  त्यांनी उमेजा क्लिनिक हॉस्पिटलमधील डॉ.  अफ्रीन अय्युब कलबुर्गी यांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राची कलर प्रिंट काढून त्याची छेडछाड केली. प्रवास करणाºया प्रवाशांना कोरोना नसल्याचे बनावट प्रमाणपत्र दिले़  शुभम ई-सेवा केंद्रावर पोलिसांनी गुरुवारी छापा मारला आणि त्यांच्या ताब्यातील दहा ते बारा कोरे वैद्यकीय प्रमाणपत्र जप्त केले़  याबाबत डॉ़  अफ्रीन अय्युब कलबुर्गी (वय ३०, रा़  पुरंंदर अपार्टमेंट, व्यंकटेश नगर) यांनी वरील दोन्ही आरोपींविरुद्ध फिर्याद दिली़  त्यानुसार आरोपींच्या नावे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त वैशाली कडुकर, उपायुक्तबापू बांगर, सहायक आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही़  बी़  बायस, पो.ना. संतोषा येळे, सचिन गायकवाड, मंगरुळे, अर्जुन गायकवाड, वसीम शेख, इब्राहिम शेख, प्रवीण शेळकंदे, दीपक जाधव, अमोल कानडे, पूजा कोळेकर यांनी केली आहे.

एका वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी शंभर रुपयेवरील दोन्ही आरोपींनी डॉ़  कलबुर्गी यांनी दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये छेडछाड करून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले आणि गरजू प्रवाशांना प्रत्येकी पन्नास ते शंभर रुपयांना विकले़  हे काम गेल्या महिन्यापासून सुरू होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे़ अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसdoctorडॉक्टर