शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; कारने दुचाकीस्वाराला ५० मीटर फरपटत नेले अन् पुढे काय झालं वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 10:43 IST

अंत्रोळीकरनगरातील घटना : पाठ सोलून निघाली, पण तरुणाचा जीव वाचला

सोलापूर : फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या हगलूर येथील तरुणाला अंत्रोळीकरनगर रस्त्यावर जीप चालकाने पाठीमागून ठोकरले. धडकेनंतर जीप चालकाचा वाहनावरील ताबा सुटून त्याने दुचाकीला जवळपास ५० मीटरपर्यंत फरपटत नेले. यात सूरज दादासाहेब पवार (वय २२, हगलुर, दक्षिण सोलापूर) हा तरुण जखमी झाला. त्याला उपस्थितांनी उपचारासाठी लगेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

सूरज हा कुमठा नाका येथून आसरा चौकाकडे दुचाकीवरून जात होता. कुमठा नाका ते महिला हॉस्पिटलदरम्यान पाठीमागून येणाऱ्या (एमएच १४ - सीसी ६०६२) या जीपने ठोकरले. यात दुचाकी कारच्या समोरील भागात अडकली. दरम्यान, सूरज दुचाकीवरून पडला आणि थोड्याच अंतरावर बाजूला झाला. मात्र जीपचालकाने ५० मीटरपेक्षा जास्त अंतर दुचाकीला फरपटत नेले. त्यानंतर तेथील विजेच्या खांबाला धडक देऊन गाडी थांबली. त्यावेळी धडकेमुळे मोठा आवाज झाला. यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीचा चेंदामेंदा झाला होता. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

हाताचे कोपरे रक्तबंबाळ

धडकेनंतर पाठीवर पडल्याने तरुणाचा शर्ट फाटला आणि त्याच्या पाठीचा भाग पूर्ण सोलून निघाला. याशिवाय दोन्ही हाताचे कोपरे आणि पायालाही जखम झाली होती. दरम्यान, अपघातानंतर कारचा चालक तेथे थांबला नाही, अशी माहिती तेथील रविकांत कोळेकर यांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात