शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; अल्पवयीन मुलीवर दहा जणांनी केला सामूहिक अत्याचार; सोलापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 10:35 IST

सहा महिन्यांपासून सुरू होता प्रकार; रिक्षाचालकांसह दहा जणांविरुद्ध पॉक्सो व अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

ठळक मुद्देअल्पवयीन मुलगी ही येथील एका कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीमध्ये शिकत आहे दीड महिन्यापूर्वी तिच्यावर निर्जन ठिकाणी सामूहिक अत्याचार झालावारंवार वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार झाल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले

सोलापूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी रिक्षाचालकांसह दहा जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. यामध्ये ५ ते ६ रिक्षा चालकांचा समावेश आहे. 

अल्पवयीन मुलगी ही येथील एका कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीमध्ये शिकत आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता ती एका मंदिराजवळ रडत बसली होती. तेव्हा रस्त्याने जाणाºया एका व्यक्तीने तिला हटकले. बाळा तुला काय झाले आहे? अशी विचारणा केली तेव्हा तिने पोट दु:खत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीला मुलीवर काहीतरी विपरीत प्रसंग घडल्याचा संशय आला, त्यांनी तत्काळ विजापूर नाका पोलीस ठाण्याशी फोनवरून संपर्क साधला. एकेठिकाणी अल्पवयीन मुलगी रडत असून, तिची अडचण काय आहे जाणून घ्या, असे सांगितले. या फोनवरून महिला पोलीस मुलगी असलेल्या ठिकाणी गेले. तिला विजापूर नाका पोलीस ठाण्यात घेऊन आले. तिची सखोल चौकशी केली, त्यानंतर काय घडले याची विचारणा केली. मुलीने सुरुवातीला माहिती दिली नाही, मात्र तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने तिच्यावर सामूहिक अत्याचार घडल्याचे सांगितले. 

अल्पवयीन मुलगी जून महिन्यापासून रिक्षाने कॉलेजला येत होती. नेहमीच्या जाण्या-येण्यातून एकेदिवशी त्याने अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनंतर दुसºया एका रिक्षाचालकाने तिच्यासोबत असाच प्रकार केला. तिसºया रिक्षाचालकानेही असाच प्रकार केला. मात्र काही दिवसांनंतर त्याने त्याच्यासोबतच्या ४ ते ५ मित्रांसमवेत अळीपाळीने अत्याचार केला होता. दीड महिन्यापूर्वी तिच्यावर निर्जन ठिकाणी सामूहिक अत्याचार झाला होता. तिच्यावर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार झाल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अत्याचार करणाºयांची माहिती घेऊन शोध घेतला. माहिती मिळालेल्या आरोपींपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दहा जणांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कलम ४, ६, ८ १0, भादंवि कलम ३७६-ड आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे करीत आहेत. ---------विचारपूस केल्याने गुन्हा उघडकीस- आलेल्या फोनची तत्काळ दखल घेऊन पोलीस निरीक्षक हनुमंत शेंडगे यांनी पोलिसांना मुलगी असलेल्या ठिकाणी पाठवून दिले. मुलीला ताब्यात घेतल्यानंतर आपुलकीने तिची विचारपूस करण्यात आली. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती मुलीकडून जाणून घेण्यात आली. दिवसभर केलेल्या चौकशीनंतर आरोपींना अटक केली आणि सामूहिक अत्याचाराचा गुन्हा उघडकीस आला. मुलीला जर पोलिसांनी घरी पाठवले असते तर कदाचित हा गुन्हा उघडकीस आला नसता. दरम्यान, मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित पाच जणांना अटक केली आहे. अन्य पाच जणांचा तपास सुरू असून, त्यांनाही अटक केली जाईल. दहा जणांवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे  सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसRapeबलात्कार