शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; त्रास देणाऱ्यांची नावे चिठ्ठीत लिहून करमाळ्यातील शिक्षकाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 08:45 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

करमाळा  : ‘रमेश मोहन यादव व हनुमंत आप्पा बागल यांना १४ लाख रुपये देऊनही जमिनीचा ताबा देत नाहीत. उलट मलाच दोघेही दम देत आहेत. रानाकडे दिसला तर तुझा पाय काढीन व हात काढीन असं म्हणत आहेत. त्यामुळे मी हे पाऊल उचलले आहे’ अशा मजकुराची चिठ्ठी बळीराम वारे या सहशिक्षकाने लिहून गणेश नगर येथील राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

 यात आत्महत्या केलेल्या वारे यांचा मुलगा अनिकेत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिट्टीत नाव असलेल्या रमेश मोहन यादव व हनुमंत आप्पा बागल (रा.गुळसडी) यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुरुवारी (ता. २२) गुन्हा दाखल झाला आहे.अनिकेत बळीराम वारे (वय १९) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (ता. २१) मी, वडील, आई व बहिण असे रात्री १० वाजताच्या सुमारास जेवण करून झोपी गेलो. वडील टीव्ही पाहत बसले होते. गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आईचा ओरडण्याचा आवाज आल्याने मी धावत किचनमध्ये गेलो. तेव्हा वडिलांनी साडीने गळफास घेतल्याचे दिसले. तेव्हा वडिलांची हालचाल बंद होती. त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन आलो. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

      पहाटे ३ वाजताच्या सुमारास वडील टीव्ही पाहत बसले होते तेव्हा टीव्ही बंद करून आईने झोपण्यास सांगितले व आई झोपी गेली.सकाळी सात वाजता उठून काम करण्यास किचनमध्ये गेली. तेव्हा वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यांच्या पॅन्टच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यावर काळया पेनाने वडिलांच्या हस्तक्षरामध्ये ‘रमेश मोहन यादव व हनुमंत आप्पा बागल यांना मी १४ लाख रुपये दिले. तरीही जमिनीचा ताबा देत नाहीत. उलट मलाच दोघेही दम देतात. रानाकडे दिसला तर तुझा पाय काढू, हात काढू म्हणत आहेत. त्यामुळे मी हे पाऊल उचलले असे चिठ्ठीत  म्हटले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीkarmala-acकरमाळा