शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक; अल्पवयीन मुलीचा खून करुन प्रेत रेल्वे रुळावर टाकून दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 10:51 IST

अक्कलकोट : तालुक्यातील चिंचोळी (मैं.) येथून फूस लावून पळवून नेलेल्या एका १६ वर्षीय मुलीस रुद्देवाडी शिवारात ठार मारून पुरावा ...

ठळक मुद्दे- अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळी येथील मुलगी- रूद्देवाडी शिवारात ठार मारून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न- अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

अक्कलकोट : तालुक्यातील चिंचोळी (मैं.) येथून फूस लावून पळवून नेलेल्या एका १६ वर्षीय मुलीस रुद्देवाडी शिवारात ठार मारून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

रुपाली विजयकुमार आंदेवाडी असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव असून, २२ सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत मृत मुलीचे वडील विजयकुमार हणमंत आंदेवाडी यांनी दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी नीलकंठ उर्फ कंट्यप्पा बसप्पा बजंत्री उर्फ गायकवाड (रा़ सिन्नूर), परशुराम शिवप्पा बजंत्री (रा़ दुधनी, ता़ अक्कलकोट) या दोघांनी स्वत:च्या मोटरसायकल(क्ऱएम़ एच़ १३/ बी. डी. १९८४)वर बसवून तिला चिंचोळी येथे घेऊन गेले. धारदार हत्याराने वार करुन तिला जीवे ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रेल्वे रुळावर टाकून दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डा़ॅ संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस शिपाई काशिनाथ सदाफुले, हवालदार दीपक पाटील, हवालदार संजय जाधव, पोलीस नाईक राजू कोळी हे घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला़ त्यानंतर पोलिसांनी त्या दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात  घेतले़ अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत.

पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार- घटनास्थळी पोलिसांनी पंचनाम्यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला़ मात्र अक्कलकोट येथे महिला डॉक्टर नसल्याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले़ रात्री उशिरा चिंचोळी या मूळगावी पोलीस बंदोबस्तात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुनामागचे नेमके कारण पोलिसांना अद्याप समजू शकले नाही.  

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMurderखूनSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस