शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

धक्कादायक; ‘त्या’ दुधात आढळले मेलामाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:58 AM

भेसळयुक्त दुधात मेलामाईन व स्वॉरबीटॉल, पॅरॉफिन, मिल्क पावडर असल्याचा अहवाल

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाकडे आलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध कारवाई आणखी तीव्रतिरुमला डेअरीचा केमिस्ट गोरख धांडे व दुसºया डेअरीतील केमिस्ट साळुंके हे दोघे अद्याप फरारभेसळयुक्त दुधात मेलामाईन व स्वॉरबीटॉल, पॅरॉफिन, मिल्क पावडर असल्याचे नमूद

सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाने पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध केंद्रावर छापा मारून जप्त केलेल्या दुधाच्या नमुन्यात मेलामाईन असल्याचा प्रयोगशाळेने अहवाल दिला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली. 

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १० जानेवारी रोजी सुगाव येथील श्रीराम दूध केंद्रावर छापा मारून रसायनाद्वारे तयार केलेले ६३८ लिटर कृत्रिम दूध व असे दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया विविध प्रकारच्या रसायनयुक्तपावडरीचा २७१९ किलो साठा जप्त करण्यात केला होता. 

जप्त केलेल्या साठ्यात एक मेलामाईनची पिशवी आढळली होती. यावरून डेअरी मालक डॉ. दत्तात्रय जाधव व त्याचा नोकर गणेश गवळी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८,२७२,२७३,३२८ व अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

डॉ. जाधव याने भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी डेअरीमध्ये आणून ठेवलेला व कायद्याने बंदी असलेल्या मेलामाईन या पदार्थाचा ५० किलोचा (किंमत : १0 हजार २00 रु.) वापर केल्याचे आढळले होते. त्याचबरोबर २९८ किलो दूध पावडर (३५ हजार ७६0 रु.),              १२४९ किलो व्हे. परमीट पावडर (१ लाख ९ हजार ९१२ रु.), ८२४  किलो लॅक्टोज पावडर (९८ हजार  ८८0 रु.), २९८ किलो पॅराफिन (१४ हजार ९00 रु.) असे ४ लाख २ हजार १२ रुपये किमतीचे भेसळीसाठी लागणारे रसायन सापडले होते. हा साठा जप्त करण्यात आला तर तसेच भेसळीने तयार केलेल्या दुधाचे नमुने घेऊन हे दूध जागेवर ओतून देण्यात आले होते. 

दुधाचे नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून देण्यात आले होते. प्रयोगशाळेने मेलामाईनबाबत पॉझीटिव्ह अहवाल दिला आहे. भेसळयुक्त दुधात मेलामाईन व स्वॉरबीटॉल, पॅरॉफिन, मिल्क पावडर असल्याचे नमूद केले आहे, असे राऊत यांनी सांगितले. 

दोन्ही केमिस्ट फरारयाप्रकरणी गुन्हा दाखल असलेले तिरुमला डेअरीचा केमिस्ट गोरख धांडे व दुसºया डेअरीतील केमिस्ट साळुंके हे दोघे अद्याप फरार असल्याची माहिती करकंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाकडे आलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातील केमिस्ट साळुंके हा प्रतिलिटर एक रुपया कमिशन घेऊन दूध स्वीकारत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरFDAएफडीएmilkदूधMilk Supplyदूध पुरवठाPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस