शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

धक्कादायक ; रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 10:10 IST

पोलिसांत तक्रार : औषध कंपनीवर दावा ठोकण्याची रुग्णालयाची तयारी

ठळक मुद्देया प्रकरणाची रुग्णालयाने गंभीरतेने दखल घेतली अहवाल आल्यानंतर होणार गुन्हा दाखलआरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे रुग्णालयात दाखल

सोलापूर : येथील सोलापूर सहकारी रुग्णालयातील भांडारातून घेतलेल्या इंजेक्शन द्यावयाच्या औषधाच्या बाटलीत (सलाईन) अळ्या आढळून आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, अन्न व औषध प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनानेही भांडारातील औषधांची तपासणी केली. दरम्यान, या प्रकरणाची रुग्णालयाने गंभीरतेने दखल घेतली आहे. 

पृथ्वीराज दत्तात्रय चव्हाण (वय २ वर्षे, रा़ रविवार पेठ, कबीर मठाजवळ, सोलापूर) या मुलाला तीन दिवसांपूर्वी ताप, सर्दी, खोकल्याचा आजार जडल्याने त्याला सोलापूर सहकारी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉ़ शिरसी यांचे उपचार सुरू करण्यात आले. शनिवारी सकाळी डॉक्टरांनी लिहून दिलेले दोन इंजेक्शन आणण्यात आले. त्याबरोबर सलाईनही मागवली गेली.

पहिले इंजेक्शन सलाईनद्वारे रूग्णाला देण्यात आले. दुसरे इंजेक्शन दिले जात असताना त्यामध्ये नातेवाईकांना अळ्या दिसून आल्या. अळ्या लक्षात येताच नातेवाईकांनी रुग्णालयातील नर्स व डॉक्टरांकडे चौकशी केली. त्यानंतर नातेवाईकांनी थेट जेलरोड पोलीस ठाणे गाठले. मुलाचा काका शंकरराव चव्हाण (रा. रविवार पेठ) यांनी पोलिसांत तक्रार करून संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी रविवारी अन्न व औषध प्रशासन विभागाला बोलावून सलाईन व इंजेक्शनची तपासणी केली. दोन्हींचे नमुने घेतले असून, तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल अन्न व औषध प्रशासनाने घेतली असून, एका पथकाद्वारे सोलापूर सहकारी रूग्णालयाचे औषधी भांडार तपासण्यात आले. तर सोलापूर सहकारी रूग्णालयाच्या प्रशासनाने इंजेक्शन पुरवणाºया कंपनीवर दावा ठोकण्याची तयारी केली आहे. राज्य आरोग्य मंत्रीही रुग्णालयातइंजेक्शनमध्ये अळी आढळल्याच्या चर्चेने शहरात जोर धरल्यानंतर आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख हेदेखील रुग्णालयात दाखल झाले.

अहवाल आल्यानंतर होणार गुन्हा दाखल- सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचार घेत असताना पृथ्वीराज चव्हाण या बालकाला लावण्यात आलेल्या सलाईनमध्ये आढळून आलेल्या अळ्यांचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती फौजदार दांडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

घडलेल्या प्रकाराला औषध कंपनी पूर्णत: जबाबदार आहे़ पहिला डोस देत असताना असे जंतू आढळले नाहीत़ मात्र दुसºया डोसमध्ये जंतू आढळल्यानंतर तो तत्काळ थांबवला़ कंपनीने केलेल्या चुकीवर आज बैठक बोलावली आहे़ त्या कंपनीविरोधात दावा ठोकण्याबाबत चर्चा होणार आहे़ -डॉ़ सुरेश मणुरेमुख्य वैद्यकीय अधिकारीसोलापूर सहकारी रुग्णालय 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयHealthआरोग्य