शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 10:57 IST

पतीला दहा वर्षे सक्तमजुरी; सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

ठळक मुद्देखटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले, त्यापैकी साक्ष व वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरलाभविष्यात असे आणखी प्रकार घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केला

सोलापूर : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला विषारी औषध पाजून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी पतीला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. 

नामदेव रामचंद्र चोरमुले (वय ४४,रा. चोरमुले वस्ती, वाघोली,  ता. मोहोळ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, नामदेव चोरमुले हा दि.१ आॅगस्ट २०१५ रोजी रात्री ८ वाजता घरी आला. तेव्हा त्याची पत्नी राणी नामदेव चोरमुले ही शेजारी असलेल्या बहीण सुनीता पाडुळे हिच्या घरात बसली होती. नामदेव चोरमुले तेथे गेला व त्याने दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करू लागला. पत्नी उठली व स्वत:च्या घरात आली. तेव्हा नामदेव चोरमुले हा घरात येऊन रात्रभर भांडत राहिला. दुसºया दिवशी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तू वागण्यास नीट नाही, तुझे कोणाबरोबर लफडे आहे असे म्हणत घरातील गोचीड मारण्याच्या औषधाची बाटली घेतली. तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत पत्नीच्या छातीवर बसून जबरदस्तीने गोचीड मारण्याचे औषध पाजले होते. औषध तोंडात गेल्याने पत्नीला त्रास होऊ लागला व ती बेशुद्ध झाली होती. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात तिची फिर्याद घेतली. 

या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. नामदेव चोरमुले याला अटक करून सहायक पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व डी.बी. खैरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अहमद काझी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एस.आर. शेटे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल धर्मे यांनी काम पाहिले. 

आरोपीला दया दाखवू नये : अ‍ॅड. अहमद काझी- खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी साक्ष व वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. शिक्षेच्या मुद्यावर युक्तिवाद करताना सरकारी वकील अ‍ॅड. अहमद काझी यांनी आरोपीला दया दाखवू नये कारण असे प्रसंग त्याने यापूर्वीही अनेक वेळा केले होते. पूर्वी अंगावर रॉकेल ओतले होते. भविष्यात असे आणखी प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा. दंड न भरल्यास एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय