शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; आईच्या मदतीने मुलाने काढला भांडखोर बापाचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 17:28 IST

भंडारकवठे खून प्रकरण: संशयितांना निवर्गी येथून घेतले ताब्यात

ठळक मुद्देभांडण झाल्याच्या रात्री मुलगा अतिषने वडील दत्तात्रय यांच्या डोक्यात कुºहाडीने घाव घातलावळसंग येथील दत्तात्रय सिद्धाराम चौगुले (वय ५०) हे निवर्गी (ता. इंडी) येथे अनिलकुमार तांडेकर यांच्या शेतात सालगडी म्हणून कामास होते़या प्रकरणी मयताची पत्नी सुनीता (वय ४७), मुलगा अतिष (वय २३) आणि एक अल्पवयीन मुलासह चडचण पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले

सोलापूर : रोज दारू पितो, घरात नेहमी भांडण करतो, सतत मारहाण करतो, अशा अनेक कारणाने वैतागलेल्या मुलाने लहान भाऊ, आईच्या मदतीने जन्मदात्या बापाचाच काटा काढला. त्याची हत्या करून भंडारकवठेजवळ भीमा नदीत प्रेत फेकून दिल्याची कबुली संशयित मुलगा आणि मयताच्या पत्नीने पोलिसांसमोर आज दिली.

वळसंग येथील दत्तात्रय सिद्धाराम चौगुले (वय ५०) हे निवर्गी (ता. इंडी) येथे अनिलकुमार तांडेकर यांच्या शेतात सालगडी म्हणून कामास होते़ कुटुंबीयांसमवेत शेतातील वस्तीवर राहत होते. गुरुवारी भंडारकवठेनजीक भीमा नदीपात्रात छिन्न-विच्छिन्न अवस्थेतील प्रेत पोत्यात बांधून टाकण्यात आले होते़ या प्रकरणाची माहिती मंद्रुप पोलिसांना देण्यात आली़ पोलीस पाटील अशोक मुकाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत नंतर अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मृताची ओळख पटत नव्हती़ त्यांच्याकडे कसलाही पुरावा नव्हता़ त्यामुळे मंद्रुप पोलिसांनी मयताचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर घटना घडल्याने हा फोटो कर्नाटकात गेला. त्याचा फोटो पाहून अनिलकुमार दांडेकर यांनी मंद्रुप पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्यामुळे मयताची ओळख पटली. मात्र आरोपी सापडत नव्हते. 

या प्रकरणी मयताची पत्नी सुनीता (वय ४७), मुलगा अतिष (वय २३) आणि एक अल्पवयीन मुलासह चडचण पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतले. त्यांना मंद्रुप पोलिसांच्या स्वाधीन केले. सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी पोलिसी खाक्या दाखविताच पत्नीने खुनाची कबुली दिली. नवºयाचा आपल्याला खूप त्रास होता. तो रोजच दारू पिऊन यायचा आणि घरातील सर्वांशी भांडायचा. त्यामुळे वैतागून आम्हीच त्याचा काटा काढला, अशी कबुली पत्नी सुनीताने दिली.

मूळ ठिकाणी येताच पोलिसांचा छापाघटनेनंतर मयत दत्तात्रय चौगुले यांची पत्नी आणि दोन्ही मुले गायब होती़ त्यांचा मोबाईल बंद होता. मंद्रुप पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. चार दिवस इस्लामपूर, आटपाडी, विटा येथे मुक्काम करून रविवारी रात्री निवर्गी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ चडचण पोलिसांच्या मदतीने मंद्रुपच्या पोलिसांनी अचानक छापा टाकून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले़ अल्पवयीन आरोपीची न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

दुचाकीवरून प्रेत भीमा नदीत आणून टाकलेभांडण झाल्याच्या रात्री मुलगा अतिषने वडील दत्तात्रय यांच्या डोक्यात कुºहाडीने घाव घातला. पत्नी सुनीताने छातीवर, कपाळावर विळ्याने वार केले. मृत्यू झाल्यानंतर त्याचे प्रेत पोत्यात घालून लहान भावाच्या मदतीने दुचाकीवर टाकून रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान भीमा नदीपात्रात टाकण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली़

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकMurderखून