धक्क्कादायक; कोराेनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठांचा मृत्यू सर्वाधिक ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 01:20 PM2020-12-03T13:20:05+5:302020-12-03T13:20:11+5:30

सोलापुरातील प्रशासन सतर्क : सर्वेक्षण व तत्काळ उपचारावर दिला भर

Shocking; Elderly deaths highest in Korana's first wave! | धक्क्कादायक; कोराेनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठांचा मृत्यू सर्वाधिक ! 

धक्क्कादायक; कोराेनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठांचा मृत्यू सर्वाधिक ! 

Next

राजकुमार सारोळे

सोलापूर : नोव्हेंबरअखेर ग्रामीणमध्ये १ हजार ४० जणांचा कोरोनाने मृ्त्यू झाला. यामध्ये ६० वर्षापुढील व्यक्तींची संख्या सर्वाधिक असून मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने यंत्रणा कामाला लावली आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोव्हेंबरपर्यंत म्हणजे पहिल्या लाटेत ग्रामीणमध्ये १ हजार ४० तर शहरात ५६३ जणांचा मृत्यू झाला आहे. नाेव्हेंबरमध्ये शहरात मृत्यूचे प्रमाण कमी झाले तर ग्रामीणमध्ये ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीणमध्ये सर्वाधिक म्हणजे ३६३ मृत्यू सप्टेंबरमध्ये झाले.

ॲागस्टमध्ये २४८ तर ॲाक्टोबरमध्ये १९८ मृत्यू झाले. दिवाळीनंतर पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण कमी झाले असून मृत्यूदर कमी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी लक्ष घातले आहे.  दोनवेळा आढावा बैठका घेऊन गावे कोरोनामुक्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यासाठी सर्व  यंत्रणा कामाला लावली आहे. 

१४६ जणांचा नोव्हेंबरमध्ये मृत्यू
- नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाने   १४६ जणांचा मृत्यू झाला. यात ग्रामीणमधील ११४ तर शहरातील    ३२ जणांचा समावेश आहे.  पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात १ लाख ८ हजार ४१ कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात ५ हजार ३४६ जण पॉझिटिव्ह आले. नोव्हेंबरमध्ये पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ४.९४ टक्के इतके आहे. 

शहरात ५६३ तर ग्रामीणमध्ये १०४५ मृत्यू 
- सध्या देशभर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण नोव्हेंबरअखेर सोलापूर शहर व ग्रामीण भागात चाचण्यांच्या मानाने पॉझिटिव्ह  रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. n शहरात ५६३ तर ग्रामीणमध्ये १ हजार ४५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ६० वर्षापुढील आहेत. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांची जादा काळजी घेतली जात असून घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे.

Web Title: Shocking; Elderly deaths highest in Korana's first wave!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.