शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बेडची वाट न पाहता रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी रस्त्यावरच लावले ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 1:00 PM

करमाळा तालुका : बेड फुल्ल, मंगल कार्यालये, पालिका हॉल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

नासीर कबीरकरमाळा : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत गेल्या आठ दिवसांपासून दररोज ९० ते १०० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. करमाळ्यात कोरोनाबाधितांच्या इलाजासाठी २७५ बेडची क्षमता असताना सध्या दुप्पट ५०२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजनसह कोविड केअर सेंटर हाउसफुल आहेत.अशावेळी एका खासगी डॉक्टरांनी बेडची वाट न पहाता त्यांचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरच ऑक्सिजन लावले अन्‌ मग त्याला पुढील उपचारासाठी रवाना केले.

करमाळा प्रशासनाकडून नगरपालिकेचे गाळे, मंगल कार्यालये, हॉल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने स्ट्रेचरवर ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १५० व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला ८०, असे एकूण २३० क्षमतेचे दोन कोविड केअर केंद्र आहेत. चव्हाण महाविद्यालयात २९५, तर आंबेडकर प्रशालेत १६२, असे क्षमतेपेक्षा दुप्पट बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तीन डेडिकेटेड कोविड केंद्रे आहेत. उपजिल्हा रुग्णालयात १० बेड, कमलाई हॉस्पिटल २५ बेड, शहा हॉस्पिटल येथे १० बेड उपलब्ध केले आहेत.

करमाळ्यात एकाही रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उपचारसाठी बार्शी, अहमदनगर येथे हलवावे लागत आहे. तेथे गेल्यानंतरही बेड उपलब्ध नसल्याने रुग्णाचा जीव जात आहे. करमाळ्यात ऑक्सिजन बेड वाढवावेत.-बबन आरणे, नागरिक

सध्याच्या दोन कोविड केअर सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने बाजार समितीचा हॉल, करमाळा नगर परिषदेच्या गाळ्यासह शहरातील मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही स्वयंसेवी संस्था व नेतेमंडळी स्वत: पुढाकार घेऊन कोविड सेंटर सुरू करू इच्छित आहेत.-समीर माने, तहसीलदार

उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितावर इलाजासाठी १० बेडला ऑक्सिजनची सोय असून, सर्व बेड गेल्या आठ दिवसांपासून फुल आहेत. तातडीच्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्ट्रेचरवर झोपवून ऑक्सिजन देऊन इलाज केला जात आहे.-डॉ. अमोल डुकरे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या