शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

धक्कादायक; मुलगा खाली डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स शोधायला गेला.. तोपर्यंत आईने प्राण सोडला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:43 IST

सोलापुरातील क्वारंटाईन सेंटरमधील घटना; उपचाराविना सोलापुरातील महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देमनपाने ३५० नागरिकांची तपासणी करण्यासाठी केवळ एका डॉक्टरची नेमणूक केलीरेणुका नल्ला यांचा मृतदेह कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले नल्ला कुटुंबीयांना दुरूनच अखेरचे दर्शन घ्यायला सांगण्यात आले

सोलापूर : मला क्वारंटाईन सेंटरमध्ये श्वास घ्यायला त्रास होतोय. डॉक्टर बघत नाहीत, गोळ्या-औषधं देत नाहीत. मला इथून घेऊन जा, नाहीतर मारून टाक... असा टाहो आईने आपल्या मुलासमोर फोडला. मुलगा खाली डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स शोधायला गेला. तोपर्यंत आईने प्राण सोडला...

महापालिकेच्या वालचंद महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये बुधवारी सकाळी रेणुका नल्ला या महिलेचा उपचाराविना मृत्यू झाला. रेणुका यांचे पुत्र लक्ष्मण यांनी घडला प्रकार कथन केला. ते म्हणाले, आईला तीन दिवसांपासून श्वास घेताना दम लागायचा. क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगले जेवण मिळत नाही म्हणून मी घरातून जेवण आणून द्यायचो. येथील डॉक्टर काजल कोडिटकर यांना आईच्या प्रकृतीबद्दल सांगायचो तर त्या व्यायाम करायला सांगा. दोन-तीन दिवसांत कमी होईल म्हणून सांगायच्या. बुधवारी सकाळी आठ वाजता मी चहा द्यायला आलो तर आईला फारच त्रास होत होता. डॉक्टर कोडिटकर यांना फोन केला तर त्यांनी दहा वाजता आल्यानंतर बघू, असे सांगितले. खाली थांबलेल्या वॉचमनने तर मी तुम्हाला फारशी मदत करू शकत नाही, असे सांगितले.

आमची मदत करायला महापालिकेचा एकही कर्मचारी, अधिकारी नव्हता. पुन्हा चार पायºया चढून वर खोलीत आईकडे गेलो तर आईने जीव सोडला होता. दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे शहराध्यक्ष गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक राजकुमार हंचाटे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जुबेर बागवान, युवराज पवार आदी क्वारंटाईन सेंटरमध्ये आले. सेंटरमधील लोक ऐकायला तयार नव्हते. पोलीस आणि नगरसेवकांनी या नागरिकांची समजूत काढायचा प्रयत्न केला. लोक समस्या मांडतात तेव्हा दुर्लक्ष करतात. अंगावर येतात तेव्हा आम्हाला पुढे का करता, असा सवालही धुत्तरगावकर यांनी केला.

कोरोना चाचणी पॉझिटिव्हरेणुका नल्ला यांचा मृतदेह कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले. त्यामुळे नल्ला कुटुंबीयांना दुरूनच अखेरचे दर्शन घ्यायला सांगण्यात आले. कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णाची स्वॅब टेस्ट घेतली नाही म्हणून पालिकेने एका खासगी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता मनपाच्या डॉक्टरांवर कारवाई होईल का?, असा सवालही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्षमनपाने ३५० नागरिकांची तपासणी करण्यासाठी केवळ एका डॉक्टरची नेमणूक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवू नका. त्यांना रुग्णालयात किंवा विशेष निगराणीखाली ठेवा, अशी मागणी आम्ही पूर्वीपासून करतोय तरी त्याकडे दुर्लक्ष केले गेले. वरिष्ठ अधिकाºयांवर सेंटरच्या देखरेखीची जबाबदारी आहे. बुधवारी घटना घडल्यानंतर तीन वरिष्ठ अधिकारी पळत आले. यापूर्वी किमान एकाने नियमित भेट दिली असती तरी रेणुका नल्ला यांचे प्राण वाचले असते.

खासगी रुग्णालयात जातो म्हटले तरी सोडले नाही..रेणुका नल्ला यांचा त्रास वाढत असल्याने लक्ष्मण आणि नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी मंगळवारी सकाळी क्वारंटाईन सेंटरमधील डॉक्टरांची भेट घेतली होती. आम्ही आईला खासगी रुग्णालयात दाखल करतो. त्यांना जायची परवानगी द्या, अशी विनंती केली. परंतु, सोडता येणार नाही असे सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका