शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; शासकीय रूग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:04 IST

जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापतींचा आरोप; इंजेक्शन कुणासाठी हिशोब नाही

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असल्याबाबत झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी चिंता व्यक्त केलीग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. रुग्णांना बेड व आॅक्सिजनचा साठा कमी पडत आहेआरोग्य विभागाचे नियोजन दिसत नाही. एका रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती.

सोलापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या साहित्य खरेदीत मोठी गडबड आहे. त्याचबरोबर सेस फंडातून खरेदी केलेली औषधे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या ताब्यात देण्यात आली व सिव्हिलमध्ये यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यात येत आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी सोमवारी केला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी आरोग्य विभागाच्या सर्व साहित्य व औषध खरेदीला कोणताही आक्षेप न घेता मंजुरी दिली. त्यामुळे प्रशासनाने याचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा दराने साहित्य खरेदी केल्याचे दिसून येत आहे. सॅनिटायझर, आॅक्सिमीटर, थर्मल गन यांच्या किमती बाजारापेक्षा जास्त लावण्यात आल्या आहेत. अँटिजेन किटची महापालिका, शल्यचिकित्सक यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. रुग्णांसाठी नेबुलायझर खरेदी केले, ते कुठे आहेत व त्याचा वापर सुरू आहे काय, याचा शोध घेतला जात आहे. साहित्य व औषध खरेदीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसू येत असून, यासंबंधी दोषी असलेल्या सर्व अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागणी करणार असल्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून औषध खरेदीसाठी १ कोटी दिले. तसेच जिल्हा नियोजनमधून निधी दिला. बाजारात रेमडेसिविर इंजेक्शन पन्नास हजाराला असताना पंचाहत्तर हजाराने खरेदी झाली आहे. याशिवाय हे इंजेक्शन कोणासाठी वापरले याचा हिशोब सांगितला जात नाही. हे इंजेक्शन काळ्याबाजाराने खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णांना पुरविले याची धक्कादायक माहिती माझ्याकडे आहे, असे डोंगरे यांनी सांगितले.

कोण हे डॉ. मस्केग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. रुग्णांना बेड व आॅक्सिजनचा साठा कमी पडत आहे. यावर आरोग्य विभागाचे नियोजन दिसत नाही. एका रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती. जिल्हाधिकाºयांना फोन केल्यावर त्यांनी मला शल्यचिकित्सक डॉ. ढेले यांचा नंबर दिला. त्यांनी सिव्हिलचे डॉ. मस्के यांचा नंबर दिला. त्यांचाही मोबाईल बंद होता. कोण हे डॉ. मस्के मला माहिती नाही, पण सामान्य रुग्णांनी कोणाच्या भरवशावर राहायचे, असा सवाल डोंगरे यांनी यावेळी उपस्थित केला.

परिस्थिती गंभीर : कांबळेजिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असल्याबाबत झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी चिंता व्यक्त केली. लोक रात्री-अपरात्री फोन करीत आहेत. सोलापूर व बार्शीत बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली. 

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रेमडेसिविर औषधे व्यवस्थित सांभाळून ठेवली जातात. ज्या  रुग्णाला हे औषध द्यायचे आहे, त्याच्या नावासह नोंद करून ठेवली जाते. औषधे देताना त्या रुग्णाला गरज किती आहे. हे तपासून औषध दिले जाते. या सर्व औषधांच्या नोंदी रुग्णालयाकडे आहेत.- डॉ. औदुंबर मस्के, वैद्यकीय अधीक्षक, 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं