शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सात दिवसानंतर प्रेत उकरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:56 IST

सोलापूर : पतीने केलेल्या मानसिक छळ आणि मारहाणीतून पेटवून घेतलेल्या विवाहित महिलेचे प्रेत उकरुन शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले. रईसा ...

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाºयांच्या उपस्थितीत पंचनामासात दिवसांनंतर उकरून केले शवविच्छेदनपेटवून घेतलेल्या विवाहित महिलेचे प्रेत 

सोलापूर: पतीने केलेल्या मानसिक छळ आणि मारहाणीतून पेटवून घेतलेल्या विवाहित महिलेचे प्रेत उकरुन शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले. रईसा गफूर शेख (वय ३२, रा. मोदीखाना, सोलापूर) असे मयतेचे नाव आहे. मयतेच्या नातलगांच्या विनंतीवरुन मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी हे प्रेत उकरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस सूत्रांनुसार, यातील मयत रईसा गफूर शेख हिचा पेशाने वकील असलेल्या गफूर शेख याच्याशी २८ मार्च २००९ रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या काही कालावधीनंतर पती-पत्नीची किरकोळ कारणावरुन भांडणे होऊ लागली. वेळोवेळी मारहाणही सुरु झाली. वडिलांकडून अडीच लाख रुपये हुंडा आणण्यासाठी आणि आईच्या नावावर असलेले घर नावावर करण्यासाठी तगादा लावला. शेवटी रईसाच्या वडिलांनी मुलीचा संसार सुखी व्हावा म्हणून अडीच लाख रुपयेही दिले. यानंतरही मारहाण सुरुच होती. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून रईसाने ११ नोव्हेंबर २०१८ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. 

गंभीर भाजलेल्या रईसाला सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. घरी आल्यावर एक महिन्याने ३ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या नातलगांनी मोदी कब्रस्तान येथे दफनविधी केला. यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मोदी पोलीस ठाण्यामध्ये रईसाचा मृत्यू झाल्याचे सांगून तिच्या मृत्यूचे कारण कळावे म्हणून पोलिसांकडे विनंती केली. यावरुन पोलिसांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोदी कब्रस्तान येथे वैद्यकीय अधिकारी विनोद राठोड, नातेवाईकांसमक्ष तिचा मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे सायंकाळी रईसाच्या मृतदेहाचे विच्छेदन केले. वैद्यकीय अहवालानंतर तिचे कारण स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

मृत्यूच्या कारणासाठी केले पोस्टमार्टेम- मयत रईसा आणि आरोपी गफूर शेख यांचा प्रेमविवाह झालेला होता त्यामुळे ते स्वतंत्र राहत होते. लग्नांच्या काही दिवसानंतर दोघांमध्य कुरबूर होऊन भांडणे व्हायची. यातूनच रईसाने मनस्ताप सहन न झाल्याने पेटवून घेतले. माहेरच्या लोकांनी तिच्यावर रुग्णालयात उपचार करुन घरी आणल्यानतर तिचा मृत्यू झाला. मात्र संबंधित प्रकार हा पतीने दिलेल्या त्रासामुळेच रईसाचा मृत्यू झाला असून, तिच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी  सात दिवसानंतर पोस्टमार्टेम करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल