शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

धक्कादायक; १५९ दिवसात १00२ जणांचा मृत्यू; ग्रामीण भागात कोरोना वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 16:57 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७  हजारांहून अधिक झाली १ हजार २ जणांचा मृत्यू झाला असून, १९ हजार ८४ जणांनी कोरोनावर मात केली शहरात १२ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेले

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे़ बाधित रूग्णाबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे़ मागील १५९ दिवसात १ हजार २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७  हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी १ हजार २ जणांचा मृत्यू झाला असून, १९ हजार ८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात १२ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेले व मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले. शहरानंतर बारा दिवसांनी ग्रामीण भागातील काही गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. एप्रिलमध्ये ग्रामीणमध्ये दोन पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू झाला. जून महिन्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण वाढू लागले. मृत्यूमध्ये पुढे असलेले शहर सप्टेंबरमध्ये ग्रामीणच्या तुलनेत मागे पडले. ग्रामीणमध्ये मात्र दररोज ४00 हून अधिक रुग्ण आढळत आहेत. सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी दहा रुग्ण दगावल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, १२ एप्रिल रोजी शहरात पहिला कोरोनाचा बळी गेला. त्यानंतर मृत्यू वाढत गेले. ६ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ५00 जणांचा मृत्यूचा आकडा होता. ११६ दिवसात इतके बळी गेले. लॉकडाऊननंतर ग्रामीणमध्ये मृत्यू वाढले. यानंतर अवघ्या ४३ दिवसात ५00 जणांचा बळी गेला आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत १५९ दिवसात कोरोनाचे १00२ बळी गेले आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय