सोलापूरच्या महापौरपदी शोभा बनशेट्टी यांची निवड
By Admin | Updated: March 8, 2017 13:10 IST2017-03-08T13:08:51+5:302017-03-08T13:10:08+5:30
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली आहे.

सोलापूरच्या महापौरपदी शोभा बनशेट्टी यांची निवड
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ८ - सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी घोषणा केली.
बुधवारी सकाळी 11 वाजता महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मनपा आयुक्त विजयकुमार काळम - पाटील उपस्थित होते. प्रारंभी महापौर पदासाठी अर्ज मागविण्यात आले. हात उंच करून मतदान घेण्यात आले. यावेळी शोभा बनशेट्टी यांना 49 मते मिळाली. त्यामुळे बनशेट्टी यांची महापौरपदी निवड जिल्हाधिकारी यांनी घोषित केली. बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांचा 28 मतांनी पराभव केला. शिवाय कॉंग्रेसच्या प्रिया माने यांना 18 मते मिळाली. एमआयएमच्या नूतन गायकवाड यांनी माघार घेतली. एमआयएम, बहुजन समाज पक्ष व माकपचे नगरसेवक तटस्थ राहिले. जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.