शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात शिवशाही बसचा अपघात; एकाचा मृत्यू तर ९ प्रवासी जखमी

By appasaheb.patil | Updated: August 30, 2019 10:57 IST

९ प्रवासी जखमी; पहाटे चारच्या सुमारास झाला अपघात

ठळक मुद्दे- शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास झाला शिवशाही एसटी बसचा अपघात- या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून अन्य ९ प्रवासी जखमी आहेत- अपघातानंतर पोलीस व एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली घटनास्थळला

सोलापूर : पुण्याहुन सोलापूरला येणारी शिवशाही एसटी बसचा शेटफळ फाट्याजवट अपघात झाला आहे. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला असून अन्य ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.

मल्लिकार्जुन आबुसे असे मयत प्रवासाचे नाव आहे. याबाबत एसटी प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, पुण्याहुन सोलापूरकडे येणारी शिवशाही एसटी बस (एमएच ४७ वाय २०५०) ही गाडी भरधाव वेगात सोलापूरकडे येत होती़ अचानक चालकाचा ताबा सुटल्याने गाडीचा अपघात झाला. या अपघातात एसटीचा पुढील भाग संपूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

 पुण्याहुन सोलापूर येत असलेल्या एसटी बसमध्ये एकूण १६ प्रवासी होते़ यातील एक प्रवासी जागीच मयत झाला असून अन्य ९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात जखमींना एक हजार तर मयत मल्लिकार्जुन आंबुसे यांना दहा हजाराची मदत दिली आहे. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाला होती मात्र पोलीसांच्या प्रयत्नानंतर वाहतुक सुरळीत झाली. या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीसांसह एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळला भेट दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरShivshahiशिवशाहीAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी