कासेगावचे शिवानंद स्वामी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:21 IST2021-05-01T04:21:18+5:302021-05-01T04:21:18+5:30

दक्षिण सोलापूर : महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये उत्तम कामगिरीबद्दल आणि १५ वर्षे उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल ...

Shivanand Swamy of Kasegaon is the honorary director general of police | कासेगावचे शिवानंद स्वामी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाचे मानकरी

कासेगावचे शिवानंद स्वामी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाचे मानकरी

दक्षिण सोलापूर : महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये उत्तम कामगिरीबद्दल आणि १५ वर्षे उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल कासेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील सुपुत्र व पिंपरी-चिंचवड क्राइम ब्रँच युनिट दोनचे पोलीस हवालदार शिवानंद स्वामी यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तिपत्र जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त हा सन्मान सोहळा होणार आहे. या पुरस्काराची घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केली. स्वामी यांचा सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख असल्याने त्यांना बोधचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्वामी यांनी पुणे पोलीस दलात भरती झाल्यापासून कुस्ती क्रीडा प्रकारात नैपुण्य दाखवत अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड क्राइम ब्रँच विभागातील त्यांची कामगिरीही विशेष उल्लेखनीय ठरली आहे.या सेवेचाच हा सन्मान असल्याची भावना स्वामी यांनी व्यक्त केली.

---

गावात दुग्धव्यवसाय करताना निर्माण झालेली व्यायाम व कुस्तीची आवड मला पोलीस दलात भरतीसाठी उपयोगी ठरली. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये गेली १५ वर्षे केलेल्या सेवेचे फळ या सन्मानामुळे मिळाल्याचा मनस्वी आनंद आहे. माझे आई, वडील, नातेवाईक, गावातील मित्र, कुस्तीतील गुरूजन, पोलीस दलातील अधिकारी, मित्र व सहकारी यांचे सततचे प्रोत्साहन मी कधीही विसरू शकत नाही.

- शिवानंद स्वामी,

पोलीस हवालदार, क्राइम ब्रँच युनिट २, पिंपरी-चिंचवड (पुणे)

Web Title: Shivanand Swamy of Kasegaon is the honorary director general of police