माळरानात चमकलं सोनं; डाळिंबातून मिळालं पाच लाखांचं उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:21 PM2020-01-08T12:21:47+5:302020-01-08T12:25:30+5:30

प्रयोगशील शेतकरी; मंद्रुप शिवारात जोडधंद्यातून फुलविली बाग : ४०० झाडांची केली लागवड अन् आयुष्याला मिळाली कलाटणी

Shining gold in the palace; Pomegranate yielded five lakhs | माळरानात चमकलं सोनं; डाळिंबातून मिळालं पाच लाखांचं उत्पन्न

माळरानात चमकलं सोनं; डाळिंबातून मिळालं पाच लाखांचं उत्पन्न

Next
ठळक मुद्देशेती व्यवसायासाठी मजुरांची आवश्यकता असते़ शिवाय मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढलेलीआमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी जिद्दीने कष्ट केले़ फळबागेची चांगली जोपासणा केली वेळोवेळी औषध फवारणी व बाग नियोजन सुरू असल्याचे मलकारसिद्ध जोडमोटे यांनी सांगितले

रेवणसिद्ध मेंडगुदले

मंद्रुप : केवळ माळराऩ़़ कोणतेही पीक फायदेशीर ठरेल याचा भरवसा नव्हता़ त्यामुळे शेतीऐवजी पेट्रोलपंपावर यंत्र दुरुस्तीचे काम करू लागलो़ पण नागेश जोडमोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब बाग लावण्याचे नियोजन केले़ दुसºयाच वर्षी ४०० झाडांपासून तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले अन् जीवनाला कलाटणी मिळाल्याचे मलकारसिद्ध जोडमोटे यांनी लोकमतशी बोलताना आपली यशोगाधा सांगितली.

मंद्रुप शिवारात माळरान असल्याने दोन वर्षांपूर्वी तीन एकर क्षेत्रातून केवळ ज्वारीचे दोन पोतीचे उत्पादन मिळत होते़ कारण दुष्काळजन्य परिस्थिती अन्य पीक येण्याची शाश्वती नव्हती़ अशा स्थितीत नागेश जोडमोटे यांच्या मार्गदर्शनानुसार माळरानावर डाळिंब बाग फुलविण्याचे ठरविले. त्यानुसार अतिशय बारकाईने नियोजन करीत डाळिंबाची फळबाग लावली़ दोन वर्षांनंतर डाळिंबाचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली अन् जीवनाला कलाटणी मिळाली.

तीन एकर क्षेत्रात १२०० डाळिंब रोपांची लागवड केली़ यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे सुरुवातीलाच ४०० झाडांच्या डाळिंब उत्पन्नातून तब्बल पाच लाखांचे उत्पन्न मिळाले. परिणामी आमच्या परिसरात या डाळिंब बागेची चर्चा सुरू झाली.

बाग लावण्यापूर्वी मंद्रुप परिसरातील वातावरणाचा अभ्यास केला़ बाग लावल्यानंतर डाळिंब बागेवर तेल्या रोग पडणार नाही याची दक्षता घेतली व त्यानुसार नियोजन करून वेळोवेळी फवारणी आणि पाण्याचे नियोजन केले.  त्यामुळेच बागेत भगवा डाळिंब बहरू लागले.

सर्वांच्या कष्टामुळे शेती फायदेशीर
च्सध्या शेती व्यवसायासाठी मजुरांची आवश्यकता असते़ शिवाय मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे; मात्र आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी जिद्दीने कष्ट केले़ फळबागेची चांगली जोपासणा केली़ मजुरावर होणारा खर्च वाचविला आहे़ शिवाय नागेश जोडमोटे यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी औषध फवारणी व बाग नियोजन सुरू असल्याचे मलकारसिद्ध जोडमोटे यांनी सांगितले़

Web Title: Shining gold in the palace; Pomegranate yielded five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.