शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात शिंदेसेनेचा ४२ जागांचा प्रस्ताव, युतीची झाली बैठक; पहिल्यांदा सौम्य, नंतर गरमागरम चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:33 IST

शिंदेसेनेचा ४२ जागांचा प्रस्ताव; पालकमंत्री

सोलापूर : महापालिका निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांची पहिली बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत शिंदेसेनेचे संपर्कप्रमुख संजय कदम यांनी ४२ जागांची मागणी केली. इतक्या जागा शक्य नाही; पण यावर तीन आमदारांसोबत चर्चा करून कळवितो, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

होटगी रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला माजी आमदार दिलीप माने, शिंदेसेनेचे नेते, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, महेश साठे, अमर पाटील, सचिन चव्हाण आणि भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते.

बांगलादेशात अमृत मंडलची हत्या हिंदू असल्याने झाली नाही; युनूस सरकारने त्यांना गुंड म्हटले

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शहराध्यक्षांनी मनपा निवडणुकीत २५ टक्के जागा देण्याचा शब्द दिला होता. हा निरोप १०२ जागा लढण्याचा शिंदेसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपावर शुक्रवारी पुन्हा चर्चा होणार आहे. भाजप आमदारांची भूमिका पाहता सर्व २६ प्रभागांतील प्रमुख उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी ठेवा, असा निरोप पाठविण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत.

शब्द पाळायला हवा. प्रत्येक प्रभागातून एक यानुसार २६ आणि निवडून येण्याच्या निकषावर इतर प्रभागांत १६ जागा द्याव्यात, अशी मागणी केली. भाजपचे शहरात तीन आमदार आहेत. पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे व्यावहारिक पद्धतीने जागा वाटप व्हायला हवे, असे भाजप नेत्यांनी सांगितले.

सुरुवातीला शांततेत चाललेली ही बैठक नंतर गरमागरम झाली. आमदारांशी बोलून कळवितो, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.महायुतीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी आयोजित बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत रोहिणी तडवळकर, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, अमोल शिंदे, अमर पाटील, सचिन चव्हाण आदी.

बार्शीत लढलो असतो तर नगरपालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. पक्षाची ताकद वाढत असल्याचे पालकमंत्री गोरे म्हणाले. त्यावर बार्शीमध्ये आमच्या पक्षाने भाजपला मदत केली. ही मदत केली नसती तर बार्शीचा निकाल वेगळा असता. सोलापुरात युती न झाल्यास इतर पक्षांना फायदा होईल. त्यामुळे युतीचा विचार करा, असे शिंदेसेनेचे नेते म्हणाले.

शिवसैनिक भाजपचे आमदार निवडून आणू शकतात. तर ते काहीही करू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. आम्ही सन्मानाने लोकसभा, विधानसभेला त्यांचे काम केले. आता त्यांना आमची कदर नसेल तर एकट्याने लढायला तयार आहोत.अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena proposes 42 seats in Solapur, alliance talks held.

Web Summary : Shinde Sena demanded 42 seats for Solapur municipal elections. BJP will discuss with MLAs. Tensions arose during discussions about seat sharing, with both sides emphasizing their strengths and the need for alliance consideration.
टॅग्स :Solapur Municipal Corporation Electionसोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2025BJPभाजपाShiv Senaशिवसेना