कर्नाटकात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चारा पाण्यासाठी कर्नाटक राज्यातील मेंढपाळ मराठवाड्यात दाखल झाले आहेत. ते वर्षभरापासून तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यात आश्रय घेत आहेत.
कर्नाटकातील मेंढपाळ तुळजापूर परिसरात दाखल
तामलवाडी : कर्नाटकात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चारा पाण्यासाठी कर्नाटक राज्यातील मेंढपाळ मराठवाड्यात दाखल झाले आहेत. ते वर्षभरापासून तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यात आश्रय घेत आहेत. रेवाप्पा ठिगले (रा. लिंबाळा जि. विजापूर) यांच्यासह जवळपास सातजणाचे मेंढय़ाचे कळप सध्या तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा शिवारात वास्तव्यास आहेत. एक हजार मेंढय़ा, घोडी, मुलाबाळासह वर्षभरापासून भटकंती करीत आहेत. शाळकरी मुले गावी ठेवतो. इतर लहानग्यांना सोबत घेवून चारा पाण्याविना उपाशी मरणार्या जनावरांना जगविण्याचे काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. सध्या माळुंब्रा शिवारातील मठाची जमीन या मेंढपाळांना एक पर्वणी ठरली आहे. रेवाप्पा ठिगले, पंडू ठिगले, परमु दुधनार, विरु ठिगले, रमेश देवकते यांचे कळप एकत्रीत राहतात. मेंढय़ासोबत सण साजरा करतो. वर्षभरापासून गावापासून दूर आहे. उन, वारा, पावसास तोंड देत जीवन जगतो. १ वर्ष झाले गाव सोडून, तुळजापूर तालुक्यात बर्यापैकी चारा-पाणी मिळते. त्यामुळे काळजी वाटत नसल्याचे रेवाप्पा ठिगले यांनी सांगितले. तर मेंढय़ा शेतात बसविल्यानंतर त्या शेतात रासायनिक खत वापरायची गरज नसते. परंतु, सध्या परिसरामध्ये शेती रिकामी झाली नसल्याने मेंढय़ा बसविण्यासाठी शोधाशोध करावी लागत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
Web Title: The shepherds in Karnataka are lodged in Tuljapur area