रस्त्याच्या कारणावरून मेंढपाळ महिलेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST2021-06-16T04:30:14+5:302021-06-16T04:30:14+5:30

धायटी येथील उषा लक्ष्मण पाटील ही महिला रविवारी चुलत दीराच्या शेतात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेली होती. दुपारी पाऊस येईल ...

Shepherd woman beaten for road cause | रस्त्याच्या कारणावरून मेंढपाळ महिलेस मारहाण

रस्त्याच्या कारणावरून मेंढपाळ महिलेस मारहाण

धायटी येथील उषा लक्ष्मण पाटील ही महिला रविवारी चुलत दीराच्या शेतात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेली होती. दुपारी पाऊस येईल म्हणून ती शेळ्या घेऊन परत घराकडे येत असताना त्यांच्या शेजारी राहणारा बिरा दामू मासाळ यांनी तू या वाटेवरून जायचे नाही, हा आमच्या रानातील रस्ता आहे, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. तिने तुला काय करायचे ते कर, असे म्हणाली. यावेळी त्याने थांब तुझ्याकडे बघतोच असे म्हणून तिच्या हातातील वेळूची काठी हिसकावून घेऊन त्याच काठीने तिला मारहाण केली. त्यावेळी मुलगा अनिल पाटील हा रानातून पळत तेथे आला. त्यावेळेस बिरा मासाळ यांनी काठी तेथेच टाकून तुम्ही या रस्त्याने कसे काय जाता, तुमच्याकडे बघतोच, अशी धमकी दिली. याबाबत उषा लक्ष्मण पाटील हिने बिरा दामू मासाळ याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: Shepherd woman beaten for road cause